AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Movie | नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार ‘झिम्मा’, अनलॉकनंतर प्रदर्शित होणार मराठीतला ‘मोठा’ सिनेमा!

'झिम्मा' नावाचा चित्रपट येत असल्याची आधीपासूनच चर्चा होती मात्र यात कलाकार कोण असणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर या चित्रपटातील कलाकार आपल्या समोर आले असून यात चित्रपटसृष्टी, रंगमंच, टेलिव्हिजन गाजवणारे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

Marathi Movie | नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा', अनलॉकनंतर प्रदर्शित होणार मराठीतला ‘मोठा’ सिनेमा!
झिम्माचे पोस्टर
| Updated on: Mar 05, 2021 | 12:39 PM
Share

मुंबई : मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र ‘न्यू नॉर्मल’ होऊन जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, हॉटेल्स, मॉल्स सुरु झाल्यानंतर आता सिनेसृष्टीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्या जोमाने सज्ज झाली आहे. अनेक  नवनवीन चित्रपटांची घोषणा होत असतानाच, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे (Upcoming Marathi Movie Jhimma Big Marathi cinema releasing in theater after lockdown).

खरं तर ‘झिम्मा’ नावाचा चित्रपट येत असल्याची आधीपासूनच चर्चा होती मात्र यात कलाकार कोण असणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर या चित्रपटातील कलाकार आपल्या समोर आले असून यात चित्रपटसृष्टी, रंगमंच, टेलिव्हिजन गाजवणारे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, निर्मिती सावंत आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या कसलेल्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनलॉकनंतर प्रदर्शित होणारा हा पहिला मोठा मराठी सिनेमा असणार आहे.

‘नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ’!

‘नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे पोस्टरच इतके कमाल आहे. पोस्टरमधील स्टारकास्ट पाहता ‘झिम्मा’ झकास आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा असणार हे नक्की! पोस्टरवर असलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील अभिनेत्रींमध्ये सिद्धार्थ एकमेव तरुण अभिनेता आहे. त्यामुळे ‘झिम्मा’मध्ये काहीतरी ट्विस्ट असणार याचा अंदाज येतोय.

‘झिम्मा’चे पोस्टर

(Upcoming Marathi Movie Jhimma Big Marathi cinema releasing in theater after lockdown)

‘झिम्मा’मध्ये सामाजिक संदेशही!

‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर, छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे (Upcoming Marathi Movie Jhimma Big Marathi cinema releasing in theater after lockdown).

दरम्यान, हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच धमाल चित्रपट दिले. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक संदेशही दिला त्यामुळे आता ‘झिम्मा’मध्ये काय असणार यासाठी मात्र, 23 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

लग्नानंतर सिद्धार्थ पुन्हा कामात व्यस्त!

नुकताच, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री मिताली मयेकर सोबत विवाह बंधनात अडकला आहे. पुण्यातील ‘ढेपे वाडा’ या सुंदर वास्तूत या जोडीचा लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर लोणावळ्यातील ‘मचान’ रिसॉर्टमध्ये या क्यूट कपलने आपला ‘मधुचंद्र’ साजरा केला आहे. एकमेकांसोबत छान वेळ घालवत असतानाची काही क्षणचित्रे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. मात्र, लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत. मिताली ही ‘लाडाची लेक ग’ ही मलिका आणि आगामी चित्रपटात व्यस्त आहे. तर, सिद्धार्थ देखील ‘सांग तू आहेस ना?’ ही मालिका आणि ‘झिम्मा’मध्ये व्यस्त आहे.

(Upcoming Marathi Movie Jhimma Big Marathi cinema releasing in theater after lockdown)

हेही वाचा :

CHYD | लाडक्या ‘विनोदवीर’ मित्रासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, पाहा काय म्हणाला कुशल…

Digpal Lanjekar | ‘अफवांवर विश्वास ठेवू नका, मी ठीक आहे!’, ‘फत्तेशिकस्त’च्या दिग्पाल लांजेकरांचे चाहत्यांना आवाहन!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.