Digpal Lanjekar | ‘अफवांवर विश्वास ठेवू नका, मी ठीक आहे!’, ‘फत्तेशिकस्त’च्या दिग्पाल लांजेकरांचे चाहत्यांना आवाहन!

‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ सारख्या चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar )यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताने सगळेच चाहते काळजीत पडले होते.

Digpal Lanjekar | ‘अफवांवर विश्वास ठेवू नका, मी ठीक आहे!’, ‘फत्तेशिकस्त’च्या दिग्पाल लांजेकरांचे चाहत्यांना आवाहन!
दिग्पाल लांजेकर

मुंबई : ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ सारख्या चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar )यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताने सगळेच चाहते काळजीत पडले होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या प्रकृतीबद्दल उलट-सुलट चर्चांना उधाण आलं होतं. पण, आता मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच, खुद्द दिग्पाल यांनी देखील आपली प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे (Farzand fame Digpal Lanjekar is feeling well now shares thanks giving post for fans).

प्रवासा दरम्यान चक्कर आल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांच्या छातीत दुखत होते, तसेच काही काळासाठी ते बेशुद्ध देखील झाले होते. मात्र, यात काळजीचे काही कारण नसून, केवळ दगदग आणि पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे तब्येत बिघडल्याचे कळते आहे. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, तसे काहीही नसून काळजीचेही काही कारण नसल्याचे दिग्पाल यांनी म्हटले आहे.

दिग्पालची पोस्ट :

मित्रांनो,

माझी तब्येत आता ठीक आहे.
तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या काळजीबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद!!

कृपया…

Posted by Digpal Lanjekar on Tuesday, 2 March 2021

‘मित्रांनो,

माझी तब्येत आता ठीक आहे. तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या काळजीबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद!! कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आई भवानी आणि छत्रपती शिवराय यांचा आशीर्वाद पाठीशी आहेच. लवकरच सर्व ठीक होईल. पण काही दिवस सक्तीची विश्रांती सांगितली आहे. औषधे आणि विश्रांती पूर्ण झाली की पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करेन. हर हर महादेव..’, अशी पोस्ट करत त्यांनी स्वतःच्या तब्ब्येतीची माहिती दिली आहे (Farzand fame Digpal Lanjekar is feeling well now shares thanks giving post for fans).

निखिल लांजेकर म्हणतात…

दिग्पालचा छोटा भाऊ निखिल लांजेकर यांनी या संदर्भात एका वेब साईटला माहिती देताना म्हटले की, “तो आता बरा आहे आणि काळजी करण्याची गरज नाही. उलट्या झाल्यावर आणि त्याची तब्येत बिघडल्याचे काळातच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तो ठीक आहे. पण, सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. आम्ही सगळे त्याच्या सोबत आहोत. मला वाटते की, तणाव आणि कामाचा भार हे यामागील एक कारण असू शकते. परंतु, आम्ही अहवाल येण्याची वाट पाहत आहोत.’

कामात व्यस्त दिग्पाल!

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘जंगजौहर’ या सिनेमांमुळे रसिकांच्या दिग्पालकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. याच अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने दिग्पाल ‘शेर शिवराज है’ या चित्रपटासाठी खूप अभ्यास आणि रिसर्च करत आहे. ‘शिवराज अष्टक’ ही आठ चित्रपटांची मालिका दिग्पाल सादर करणार आहे, यातील ‘शेर शिवराज है’ हा सिनेमा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच कारणामुळे दिग्पाल सध्या या सिनेमाची जोरदार तयारी करत आहे.

(Farzand fame Digpal Lanjekar is feeling well now shares thanks giving post for fans)

हेही वाचा :

Saina teaser out : परिणीती चोप्राचा जबरदस्त लूक, पाहा ‘सायना’चा धमाकेदार टीझर!

Video | ‘पाहिले न मी तुला’ शीर्षकगीताला नेटकऱ्यांची पसंती, पाहा कसे तयार झाले ‘हे’ गाणे!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI