साऊथ सुपरस्टार थलपती विजयच्या शरीरावर जखमेच्या खुणा पाहून चाहते चिंतेत

| Updated on: Apr 25, 2024 | 4:27 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलपती विजयचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्या हात आणि डोक्यावर जमखेच्या खुणा पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

साऊथ सुपरस्टार थलपती विजयच्या शरीरावर जखमेच्या खुणा पाहून चाहते चिंतेत
Thalapathy Vijay
Image Credit source: Instagram
Follow us on

साऊथ सुपरस्टार थलपती विजय लवकरच पूर्णपणे राजकारणात सक्रिय होणार आहे. सध्या तो ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत तो लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी पोहोचला होता. यादरम्यान त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमधील काही गोष्टींनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. थलपती विजयच्या हातावर काही जखमेच्या खुणा पहायला मिळत आहेत. त्यावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

थलपती विजयचा 2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘घिली’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. तब्बल 20 वर्षांनंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. हे पाहून चित्रपटाच्या निर्मात्यांनी थलपती विजयची खास भेट घेतली. यावेळी फुलांची मोठी माळ त्याच्या गळ्यात घालून त्याचा सत्कार करण्यात आला. त्याचेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. या फोटोंमध्ये विजयच्या हातावर जखमेच्या खुणा पहायला मिळत आहेत. ‘गोट’ (GOAT) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विजयला थोडीफार दुखापत झाली होती. त्यावरूनच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘गोट’ या चित्रपटात बरेच अॅक्शन सीन्स आहेत. त्याचं शूटिंग करण्यासाठी चित्रपटाची टीम रशियाला पोहोचली होती. वेंकट प्रभूने या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि सहलेखन केलं असून या साय-फाय चित्रपटात विजय दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये त्यांच्यासोबत मीनाक्षी चौधरी, प्रशांत, प्रभू देवा, माइक मोहन, जयराम, स्नेहा, योगी बाबू यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट 5 सप्टेंबर 2024 रोजी तमिळ, तेलुहू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गोट’नंतर थलपती विजय हा ‘थलपती 69’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असल्याने त्याची विशेष चर्चा आहे. यानंतर विजय अभिनयातून संन्यास घेऊन राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार आहे.