तो सेल्फी व्हायरल होताच प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट… हात जोडले; म्हणाली, स्त्रीयांच्या चारित्र्याचे धिंडवडे…

अभिनेत्री श्रीलीलाचे AI-निर्मित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. श्रीलीलाने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, टेक्नॉलॉजीचा गैरवापर थांबवण्याचे आवाहन केले आहे. तिने महिलांच्या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित करत, अशा कंटेटकडे दुर्लक्ष करण्याचे आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर लक्ष वेधले आहे.

तो सेल्फी व्हायरल होताच प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट... हात जोडले; म्हणाली, स्त्रीयांच्या चारित्र्याचे धिंडवडे...
Sreeleela Post
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 18, 2025 | 10:52 AM

Sreeleela Viral Photos Controversy : सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ आणि एका फोटोने खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर पायल गेमिंग हिचा एमएमएस व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला हिचा एक सेल्फी फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पायलसोबतच श्रीलीलाही (Sreeleela ) चांगलीच संतापली आहे. श्रीलीलाने इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने यूजर्सना आवाहन करतानाच तिचा संतापही व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलीलाचे काही फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोंवर सोशल मीडियातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. चाहते कमेंट्स करत आहेत. एआयच्या मदतीने हे फोटो तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल कंटेटवर श्रीलीलाने प्रतिक्रिया दिली आहे. एआयने बनलेल्या कोणत्याही फोटोवर किंवा कंटेटवर प्रतिक्रिया देऊ नका. या कंटेटकडे दुर्लक्ष करा. ते व्हायरल करू नका. महिलांचा मान सन्मान राखा. त्यांच्या मान सन्मानाला ठेच पोहोचू देऊ नका. अशा कंटेटमुळे केवळ त्रासच होत नाही, तर मानसिक आरोग्यावर त्याचा खोल परिणाम होतो, असं श्रीलीलाने म्हटलं आहे.

टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर

मी तुम्हाला हात जोडून सांगते की, एआयने बनलेल्या या बकवास कंटेटला अधिक सपोर्ट करू नका. टेक्नॉलॉजीचा योग्य वापर आणि दुरुपयोग या दोन्हीमध्ये मोठा फरक आहे. टेक्नॉलॉजीचा हेतू आयुष्य सुखकर करणं आहे. आयुष्य अवघड करणं नसतं. प्रत्येक मुलगी कोणत्या ना कोणत्या रुपात कुणाची तरी आई, कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी बहीण, नात, मैत्रीण किंवा सोबत काम करणारी सहकारीण असते. मग ती अभिनय क्षेत्रातील का असेना. फिल्मी दुनियेचा हेतू लोकांचं मनोरंजन करणं आहे. त्यासाठी एक सुरक्षित वातावरण असणं आवश्यक आहे, असं तिने म्हटलंय.

 

त्याचा त्रास होतोय

माझं शेड्यूल अत्यंत बिझी आहे. त्यामुळे ऑनलाईनवर चाललेल्या गोष्टींकडे मी ध्यान देत नाही. सोशल मीडियातील बकवास मला मान्य नाही. ज्यांनी या प्रकरणावर सविस्तर माहिती दिली त्या शुभचिंतकांचे आभार. पण या सर्व गोष्टी खूप वेदनादायी आहे. अशा प्रकारचे फोटो व्हायरल केल्याने मानसिक त्रास होतोय. माझ्या इतर सहकाऱ्यांनाही मी या त्रासातून जाताना पाहत आहे. महिलांचा सन्मान करा. शालीनता जपा. तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढू नका, असं सांगतानाच साथ दिल्याबद्दल तिने धन्यवाद व्यक्त केले आहेत. तसेच या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचंही तिने म्हटलंय.