Shekhar Phadke : ती एक चूक अन् सुधीर जोशींनी माझ्या कानाखाली मारली…मराठी अभिनेत्यानं सांगितला प्रसंग

Shekhar Phadke : मराठी अभिनेते शेखर फडके आणि ज्येष्ठ अभिनेते सुधीर जोशी यांनी एका नाटकामध्ये एकत्र काम केलेलं. या नाटकाच्या तालमीदरम्यान सुधीर यांनी शेखर यांच्या कानशिलात लागवलेली. याबद्दलचा किस्सा शेखर यांनी मुलाखतीत सांगितलाय.

Shekhar Phadke : ती एक चूक अन् सुधीर जोशींनी माझ्या कानाखाली मारली...मराठी अभिनेत्यानं सांगितला प्रसंग
| Updated on: Oct 02, 2026 | 2:29 PM

मराठी अभिनेता शेखर फडकेनं आजवर मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर कलाकारांना चांगले वाईट अनुभव येतात. त्यातूनच कलाकार शिकतात. अनेकदा काही कलाकार त्यांना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांबद्दल मुलाखतींमध्ये भाष्य करतात. सह–कलाकारांचेही अनुभव शेअर करतात. अशातच आता मराठी अभिनेते शेखर फडके यांनी एका मुलाखतीत नाटकाच्या तालमीदरम्यानचा किस्सा सांगितला आहे. ज्येष्ठ अभिनेते सुधीर जोशी यांनी शेखर फडके यांच्या कानाखाली मारलेली. नेमकं काय घडलेलं? जाणून घ्या.

शेखर फडकेंनी सांगितला प्रसंग

Loading...

शेखर फडके म्हणाले की, ”घर श्रीमंताचं‘ नाटकादरम्यान सुधीर जोशी माझ्यावर रागावलेले. ते माझं पहिलं नाटक होतं. सुधीर जोशींनी नाटकाच्या तालमीदरम्यान माझ्या कानाखाली मारली आहे. पण, ते अभिनयासाठी. मला जमत नव्हतं आणि त्यांचं म्हणणं होतं की, तू नाही ठरवायचं, ते आम्ही ठरवणार तू चांगलं करतोय की वाईट करतोयस. समोरचा दिग्दर्शक ठरवेल. तेव्हापासून कोणतीही मालिका किंवा सिनेमा करत असलो तर मॉनिटरमध्ये बघत नाही. दिगदर्शक ओके म्हणाला तर ओके.’

‘मी जे सहा सिनेमे केले, ते आले नाहीत, एवढंच वाईट वाटतं मला. काही लोकांमुळे मला काम करायला मिळालं नाही, नाटकांमधील भूमिका गेल्या, मालिका गेल्या आणि पुन्हा त्याच भूमिकेसाठी मला विचारणा झाली, तेव्हा मी नाही म्हटलेलं आहे.’

याच मुलाखतीदरम्यान शेखर यांनी गिरीश ओक यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला आहे. शेखर फडके म्हणाले की, ‘ते खूप गोड आहेत. आम्ही त्यांना गिरीश दादा म्हणतो. आम्ही इंदोरला नाटकाच्या प्रयोगाला गेलेलो. तेव्हा गिरीश ओक आणि मी एकत्र राहायचो. तो माणूस सकाळी उठल्यानंतर व्यायाम करायचा, योगा करायचा, चालत यायचा आणि मी उठल्यावर त्यांच्यासोबत हाफ फ्राय खायचो, ते माझ्यावर रागावले होते. पण, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.’ ‘राजश्री मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत शेखर फडके बोलत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us