
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खान याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. पठाणनंतर आता जवान (Pathan) चित्रपट धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हाच ठरलाय. शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसला.
शाहरुख खान याचा आता काही दिवसांमध्ये डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन हे केले. शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून तो मोठ्या पडद्यापासून दूर होता. चाहते त्याच्या याच पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसले.
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही सध्या तूफान चर्चेत आहे. सुहाना खान हिचा चित्रपट यंदाच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे द आर्चीज या चित्रपटातून फक्त सुहाना खान हिच नाही तर अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर आणि शाहरुख खान याची लेक सुहाना खान हे बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहेत.
सुहाना खान ही सध्या सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे. सुहाना खान आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. नुकताच आता सुहाना खान हिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. सुहाना खान हिचा या फोटोमध्ये अत्यंत जबरदस्त असा लूक दिसत आहे. सुहाना खान हिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडल्याचे दिसत आहे.
सुहाना खान ही सध्या सुट्या घालवताना दिसत आहे. सुहाना खान हिचा द आर्चीज हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर तिला एक मोठा चित्रपट मिळाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये सुहाना खान हिच्यासोबत शाहरूख खान हा देखील दिसणार आहे. सुहाना खान हिने शेअर केलेल्या फोटोवर अनन्या पांडे हिने देखील कमेंट केल्याचे दिसत आहे. सुहानाने शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होतोय.