Sunita Ahuja : ‘पॉवरफुल सून’… सुनीता अहुजांकडून सूनबाईं काश्मीराचं कौतुक, दिसून आला खास बाँड

Sunita Ahuja With Kashmira Shah : सुनीता आहूजा आणि कश्मीरा शाह या एका पार्टीत एकत्र दिसल्या. त्यावेळी सुनीताने सूनबाई काश्मीरावर प्रेमाचा वर्षाव केला . त्या दोघींचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Sunita Ahuja : ‘पॉवरफुल सून’… सुनीता अहुजांकडून सूनबाईं काश्मीराचं कौतुक, दिसून आला खास बाँड
| Updated on: Oct 01, 2026 | 2:30 PM

Sunita Ahuja On Kashmira Shah : एकीकडे अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्यातील वाद थांबताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि त्याची कथित गर्लफ्रेंड लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी पोहोचले. त्यानंतर सुनीता अहुजाने दोघांवर निशाणा साधला, तसेच गोविंदावरही टीका केली. गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्यापासून, गोविंदाचा भाचा, अभिनेता कृष्णा अभिषेक आणि सूनबाई, काश्मीरा शाह हे दोघे , मामी सुनीताला सपोर्ट करताना दिसले. आताही सुनीत आणि काश्मीरा या दोघी एकत्र स्पॉट झाल्या. आता काश्मीरा शाहने पुन्हा एकदा मामी, सुनीता यांना सपोर्ट केला असून एकत्र स्पॉट झाल्यावर त्यांच्यातलंखास बाँडिंग स्पष्ट दिसून आलं.

बुधवारी, 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळा त्या दोघी एकत्र एका पार्टीत पोहोचल्या. काश्मीरा शाह, कृष्णा अभिषेक हे दोघे त्यांची मामी सुनीता अहुजा आणि त्यांचा भाऊ हर्षवर्धन यांच्यासोबत एकत्र दिसले. त्यांनी पापाराझींसमोर आनंदाने पोझ
दिली. एकमेकांसोबत ते फार खुश दिसत होते. एवढंच नव्हे तर यावेळी सुनीता या काश्मीरावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसल्या आणि विशेष म्हणजे त्यांनी तिला ‘पॉवरफुल सून’ असं म्हणतं तिच कौतुकही केलं.

Loading...

मामीने केलं सूनबाईंचं कौतुक

कश्मीरा शाह आणि सुनीता आहूजा यांच्यातील खास बॉन्ड पुन्हा एकदा पाहायला मिळाला. रेस्टॉरंटच्या बाहेर दोघींनी पापाराझींसमोर एकत्र पोझ दिल्या. यावेळी कश्मीराने मजेशीर अंदाजात स्वतःला आणि सुनीता आहूजांना ‘पॉवर कपल’ म्हटलं. यावेळी कश्मीरा म्हणाली, “ तुम्ही सगळ्यांना पॉवर कपल म्हणता ना, आम्ही आहोत पॉवर कपल .” तिच्या या मजेशीर वक्तव्यावर सुनीता आहूजांनी तिला “आमची पॉवरफुल सून” असं म्हणत कौतुक केलं. “तुमच्याकडूनच सगळं शिकले आहे.” असं म्हणंत कश्मीरानेही हसत उत्तर दिलं.

यावेळी कृष्णा अभिषेक आणि हर्षवर्धन आहूजा हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांनीही पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिल्या.

 

एका जोकमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये होता दुरावा

कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह यांचे गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्यासोबतचे संबंध काही काळ तणावपूर्ण होते. कृष्णाने टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात मामा गोविंदा यांच्याबद्दल केलेल्या विनोदामुळे या वादाला सुरुवात झाली होती. कृष्णाचा हा विनोद सुनीता आहूजा यांना फार रुचला नव्हता. यानंतर कश्मीरा शाहच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळेही वाद अधिक वाढला. तिने ‘पैशांसाठी नाचणाऱ्या लोकां’ बद्दल सूचक पोस्ट केली होती. ही टिप्पणी गोविंदा यांच्यावर करण्यात आली असल्याचे सुनीता यांना वाटलं होतं. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये बराच काळ दुरावा होता

मात्र, यावर्षीच्या सुरुवातीला ‘लाफ्टर शेफ्स’च्या सेटवर दोन्ही कुटुंबं पुन्हा एकत्रं आली. त्यानंतर जुने मतभेद मागे टाकून दोन्ही कुटुंबांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होताना दिसत आहे.

काश्मीराची सुनीता यांना साथ

सुनीता आणि गोविंदा यांच्याचील नात्यातील मतभेद गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. दोघांमधील वैयक्तिक वाद आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनला आहे. या दोघांमधील वादाच्या काळात कश्मीरा शाहने सुनीता आहूजा यांची साथ दिली. तिने सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत आपण या नात्यात आणि या वादात सुनीता आहूजा यांच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलं होतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us