Govinda: धोकेबाज..; गोविंदाने कोमलसोबत ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेतल्यानंतर भडकली सुनीता

Govinda-Sunita Ahuja: गोविंदाने अभिनेत्री आणि कथित गर्लफ्रेंड कोमलसोबत लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर सुनीता अहुजा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या काही काळापासून गोविंदा आणि कोमल यांच्या अफेअरच्या चर्चा होत आहेत.

Govinda: धोकेबाज..; गोविंदाने कोमलसोबत लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर भडकली सुनीता
सुनिता अहुजा, गोविंदा-कोमल राणी स्वर्णकार
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2026 | 12:06 PM

Govinda-Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू आहेत. त्यातच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गोविंदा त्याची सहकलाकार आणि कथित गर्लफ्रेंड कोमल राणी स्वर्णकारसोबत पोहोचल्याचा व्हिडीओ समोर आला. विशेष म्हणजे, त्याच्या काही तास आधीच सुनीता आहुजा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर सुनीताचं एक वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. बुधवारी सुनीता अहुजा मुंबई विमानतळावर दिसल्या. यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही गोविंदा आणि कोमल यांनी एकत्र घेतलेल्या दर्शनावरून असल्याचा अंदाज लावला जात आहे.

एअरपोर्टवर पापाराझींनी सुनीता यांना त्यांच्या पाळीव श्वानाबद्दल विचारलं. सुनीता यांचा कुत्रा ‘विंटर’ त्यांना विमानतळावर सोडण्यासाठी नेहमी येतो, असं सांगण्यात आलं. यावर उत्तर देताना सुनीता यांनी माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रेम करण्याचा सल्ला दिला. “माणसांना कितीही प्रेम द्या, फायदा नाही; ते धोकाच देतात,” अशा आशयाचं वक्तव्य सुनीता यांनी केलं. पुढे त्यांनी ‘माणसं धोकेबाज असतात’ असंही म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, गोविंदा आणि कोमल राणी यांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नेटकरी त्याचा संदर्भ या प्रकरणाशी जोडत आहेत.

मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी सुनीता यांनी सकाळच्या सुमारास लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याच दिवशी रात्री गोविंदा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला. मात्र, यावेळी त्याच्यासोबत पत्नी सुनीता नव्हत्या. गोविंदासोबत अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार दिसली. दोघांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. गोविंदाने यावेळी पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला होता, तर कोमल लाल रंगाच्या साडीमध्ये दिसली. त्यांच्या या एकत्र उपस्थितीमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगली आहे.

गोविंदा-सुनीता यांच्या नात्यात नेमकं काय सुरू?

गोविंदा आणि सुनीता यांनी 1987 मध्ये लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत, टीना आहुजा आणि यशवर्धन आहुजा. अलीकडे दोघांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध बातम्या समोर आल्या आहेत. सुनीता यांनी यापूर्वी गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी कोमल असंही नाव घेतलं होतं. दुसरीकडे, गोविंदाच्या मॅनेजरने दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना नकार दिला आहे.

गोविंदा-कोमलचा व्हिडीओ-

काही आठवड्यांपूर्वी सुनीता आणि मुलगा यशवर्धन फॅमिली कोर्टाबाहेर दिसले होते. त्यानंतर गोविंदाच्या मॅनेजरने सुनीता यांनी दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यासाठी कोर्टात गेल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, गोविंदाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या कथित खोट्या बातम्या आणि एआय-निर्मित कंटेंटविरोधात कायदेशीर इशाराही दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us