
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा हे बॉलिवूड कपल कायमच चर्चेत असतं. त्यांच्यातील वाद, प्रेम असो किंवा घटस्फोटाच्या बातम्या. आता सुनिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिने केलेल्या एका विधानामुळे. गोविंदा आता पडद्यापासून दूर असला तरी त्याची पत्नी प्रकाशझोतात राहते. ती सतत मुलाखती देत असते आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. आता सुनिताने खुलासा केला आहे की तिच्या पतीशी भांडणाचे एकमेव कारण म्हणजे तो काम करत नाही. तिने सांगितले की त्याच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे त्याची दिशाभूल करतात. आणि ती जे सत्य बोलते, ते अभिनेत्याला आवडत नाही.
‘मी गोविंदाशी फक्त एकाच गोष्टीवर भांडते…’
सुनीता आहुजाने एका मुलाखतीत सांगितलं की ती गोविंदाला वजन कमी करण्यास आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सांगते, पण तो तिचं ऐकत नाही. तिने सांगितले की, ‘मी गोविंदाशी फक्त एकाच गोष्टीवर भांडते, मी त्याला सांगते, तू काम कर. त्याने मला 6 ते 7 वर्षांपूर्वी सांगितले होते की मी तुला सिल्वेस्टर स्टॅलोन कसे व्हायचे ते दाखवेन. कारण तो माझा आवडता आहे. मी म्हणाले होते की या जन्मात असे होणार नाही. पुढच्या जन्मात, मला तुला माझा नवरा म्हणून नको, तर माझा मुलगा म्हणून हवा आहे.’
गोविंदा वजन कमी करत नाहीये…
सुनीता आहुजा म्हणाली, ‘गोविंदा वजन कमी करत नाहीये आणि चित्रपट करत नाहीये. मी त्याला सांगते की तू एक दिग्गज अभिनेता आहेस. तुझ्यासारखा अभिनेता कधीच झाला नाही. तू तुझं आयुष्य उध्वस्त करत आहेस कारण तू ज्या चार लोकांसोबत बसला आहेस ते तुला चांगल्या गोष्टी शिकवत नाहीत. सगळेच तुला खोटं शिकवत आहेत. चांगल्या लोकांसोबत बस. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला हे सांगणार नाहीत. त्यांना गोविंदाकडून पैसे मिळतात. म्हणून ते त्याची प्रशंसा करतात.’
मी त्याचे पाय धरून माफी मागेन…
पुढे सुनीता आहुजा म्हणाली, ‘पण तुम्ही मला खुशामत करण्यासाठी पैसे देत नाही. मी कोणाच्याही बापाची खुशामत करत नाही. मी खरे बोलते, म्हणूनच तो रागावतो. सत्य ऐकण्यासाठी मोठे हृदय लागते. पत्नी नेहमीच तिच्या पतीच्या कल्याणाचा विचार करते. आई कधीही तिच्या मुलाचे वाईट करू इच्छित नाही. पण देव त्यांना बुद्धी देत नाही. मी टीना आणि यशशीही उघडपणे बोलते, मी खरे बोलते आणि जर तुम्हाला खरे ऐकायचे नसेल, तर पुढच्या वेळी मला विचारू नका. जर आज माझी चूक असेल तर मी त्याचे पाय धरून माफी मागेन. जर माझी चूक नसेल तर मी माझ्या देवाशिवाय कोणासमोरही डोके टेकवणार नाही.’ असं म्हणत तिने गोविंदासोबत तिच्या वादाचे खरे कारण सांगितले आहे.