AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule Daughter Marriage : शरद पवारांच्या नातीचं, रेवती सुळेचं ठरलं लग्न ! सुप्रिया सुळेंचा होणारा जावई कोण ? पहिला Photo समोर

Supriya Sule Daughter Revati Marriage :शरद पवार यांची नात, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं, रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. यामुळे पवार आणि सुळे कुटुंबात अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्यावर चहूकडून अभिनंदाचा वर्षाव होत आहे. सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या मैत्रिणीने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

Supriya Sule Daughter Marriage : शरद पवारांच्या नातीचं, रेवती सुळेचं ठरलं लग्न ! सुप्रिया सुळेंचा होणारा जावई कोण ? पहिला Photo समोर
सुप्रिया सुळेंच्या लेकीच, रेवतीचं ठरलं लग्न
| Updated on: Feb 10, 2026 | 5:14 PM
Share

राष्ट्ववादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pwara) यांची नात, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची मुलगी रेवती सुळे (Ravati Sule) यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी (Sarang Lakhani) यांच्यासोबत रेवती सुळेंचा विवाह (Revati Sule Marriage) निश्चित झाला आहे. सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळच्या मैत्रीणीने ही गुड न्यूज जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत लग्न ठरल्याची बातमी शेअर केली. रेवती आणि सारंग या दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करत स्मृती यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांचही त्यांनी अभिनंदन केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारंग लखानी हे नागपूरचे आहेत, त्यामुळे रेवती सुळे या नागपूरच्या सूनबाई होणार आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुळे व पवार कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोण आहेत शरद पवारांचे होणार नातजावई सारंग ?

समोर आलेल्या माहितीनुसार, सारंग अरूण लखानी हे नागपूरचे असून, व्यवसायिक आणि उत्तम बॅडमिंटनपटू तथा विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते सुपुत्र आहेत. तेही एक उत्तम बॅडमिंटनपटू असल्याचे समजते. उद्योजक सारंग लखानी आणि रेवती सुळे यांच्या या नव्या प्रवासासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने लग्न ठरल्याची माहिती देखील समोर आली आहे.

रेवती सुळे कोण आहेत ?

रेवती सुळे या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची मुलगी आहे. शरद पवार यांची त्या नात आहेत. त्यांना विजय सुळे हा एक भाऊही आहे. रेवती सुळे यांनी London School of Economics मधून पदवी घेतली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. स्मृती शिंदे यांनी रेवती व सारंग यांचं लग्न ठरल्याची पोस्ट करताच बघता बघता ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर रेवती यांचा भाऊ, विजय सुळे यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्टोरी शेअर करत बहिणीचे व भावी जिजाजींचे अभिनंदन केलं.

Follow Us
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...