
बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान आणि सनी देओलचा ‘डर’ चित्रपट अजूनही सर्वांना आठवतो. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एक क्लासिक सायकोथ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला. चित्रपटाची कथा ते चित्रपटातील गाणे सर्वच काही चाहत्यांनी डोक्यावर घेतले. पण या तिघांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही. ‘डर’ नंतर सनी देओलने यश चोप्राबरोबर कधी काम केले नाही. इतकेच नाही तर तो शाहरुख खानसोबतही 16 वर्षे बोललाही नाही.
‘डर’च्या सेटवर नक्की काय घडलं होतं?
एका मुलाखतीत सनीने याबद्दल चर्चा केली होती. जेव्हा सनीला विचारले गेले की, ‘डर’च्या सेटवर यश चोप्रा आणि शाहरुख त्याला घाबरत होते का ? तेव्हा तो म्हणाला की, कदाचित ते यामुळे घाबरत असतील कारण ते चुकीचे वागले होते. सनीने चित्रपटाच्या सेटवर घडलेला एक प्रसंगही सांगितला.
सीनवरून झाले होते वाद…
त्या घटनेची आठवण करून देत सनी म्हणाला की, “मी शाहरुखबरोबर एक सीन करत होतो त्यामध्ये तो मला चाकु मारतो. या सीनबद्दल मी यश चोप्राशी बरीच चर्चा केली. मी म्हणालो की, मी चित्रपटात कमांडो आहे. ते पात्र फिट आहे. एखादा मुलगा (शाहरुखची व्यक्तिरेखा) त्याला येऊन कसे मारू शकेल? जेव्हा कमांडोचं लक्ष नसेल आणि तेव्हा कोणी त्याच्यावर वार केला तर ते एकवेळ समजू शकतं. पण जर कमांडो त्याच्याकडे पहात आहे तरीही तो येऊन त्याला चाकू मारतो. मग त्याला कमांडो कसे म्हणता येईल.”
रागात सनीने पॅंटचे खिसे फाडले होते
पुढे तो म्हणाला की, “यश जी मोठे होते, म्हणून मी त्यांचा आदर केला आणि मला काहीही बोलता आले नाही. मी खिशात हात घालून उभा होतो पण मला एवढा राग अनावर झाला होता. मला इतका राग होता की त्या रागात मी माझ्या हाताने पॅन्टचे खिशे फाडले होते.” हा अनुभव सनीने सांगितला.
शाहरुखशी 16 वर्ष न बोलण्याचं कारण
शाहरुखशी 16 वर्षे न बोलण्यावर शकल्यावर शाहरुख म्हणाला, ‘मी बोलत नाही असे नाही. मी फक्त स्वत: ला कटऑफ केलं होतं आणि मी जास्त सोशलाइज करत नाही. त्याची आणि माझी कधी भेट झाली नाही त्यामुळे त्यांच्याशी मुद्दाम न बोलण्याचा इथे प्रश्न येतच नाही’