सनी देओल किती श्रीमंत? पत्नी पूजाच्या वयात किती अंतर? संपत्तीच्या तुलनेत दोघांपैकी कोण अव्वल?

अभिनेता सनी देओलच्या करिअरमधली सेकंड इनिंग सध्या सुरू आहे. 'गदर 2' आणि 'जाट' यांसारख्या चित्रपटांमधून त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सनी देओलकडे किती संपत्ती आहे, ते जाणून घेऊयात..

सनी देओल किती श्रीमंत? पत्नी पूजाच्या वयात किती अंतर? संपत्तीच्या तुलनेत दोघांपैकी कोण अव्वल?
Sunny Deol and Pooja Deol with son
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2025 | 9:29 AM

पाकिस्तानात जाऊन हँडपंप उखडून पाकिस्तानी लोकांना थेट आव्हान देणारा ‘तारासिंह’ म्हणजेच अभिनेता सनी देओल सर्वांचा चाहता आहे. आपल्या देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून सनी देओलने फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली आहे. 19 ऑक्टोबर रोजी सनीने आपला 68 वा वाढदिवस साजरा केला. पंजाबमध्ये जन्मलेल्या सनीचे वडील धर्मेंद्र आणि आई प्रकाश कौर आहे. सनीला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायची आवड होती. स्टारकिड असल्याने त्याला इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी फार मेहनत करावी लागली नव्हती. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून सनी देओलने चांगली संपत्ती कमावली आहे.

सनी देओलची संपत्ती

धर्मेंद्र आणि आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मुलगा असल्याच्या नात्याने सनी देओलकडे बरीच संपत्ती आहे. त्याच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास सनी देओलची एकूण संपत्ती जवळपास 150 ते 200 कोटी रुपये इतकी आहे. ‘गदर 2’ आणि ‘जाट’ या चित्रपटांच्या यशानंतर त्याच्या कमाईत आणखी वाढ झाली.

सनी देओलची पत्नी

सनी देओलचा जन्म 19 ऑक्टोबर 1957 रोजी झाला, तर त्याची पत्नी पूजा देओलचा जन्म 21 सप्टेंबर 1957 रोजी झाला. त्यामुळे सनी देओल आणि त्याच्या पत्नीच्या वयात फक्त एक महिन्याचंच अंतर आहे.

चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर सनी देओलने राजकारण पाऊल ठेवलं. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सनीने निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दिलं होतं. त्यानुसार सनीची एकूण संपत्ती 87 कोटी रुपये आहे. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ आणि ‘जाट’ यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर त्यात चांगली वाढ झाली आहे. तर सनी देओलची पत्नी पूजा देओलकडे 6 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिच्या नावावर कोणतंच घर किंवा जमीन नाही. पूजा देओलच्या संपत्तीत 1.5 कोटी रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

करिअरच्या सुरुवातीला सनी देओलचं बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. पण त्यानेने ब्रिटिश शाही कुटुंबातील लिंडाशी लग्न केलं. लिंडाने सनी देओलशी लग्न केल्यानंतर आपलं नाव बदलून पूजा असं केलं. आज ती पूजा देओल म्हणूनच ओळखली जाते. पूजाच्या वडिलांचं नाव कृष्ण देव महल आणि आईचं नाव जून सारा महल असं आहे. जून या ब्रिटनच्या शाही कुटुंबातील आहेत. पूजा तिच्या सासूप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे. ती सहसा कोणत्या पार्टीत किंवा पुरस्कार सोहळ्यात दिसून येत नाही.