Sunny Deol : तारा सिंगची खरी पत्नी ब्रिटिश शाही कुटुंबातील; ‘या’ चित्रपटात दोघांनी केलं एकत्र काम

अभिनेता सनी देओल त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आला. सनी देओलचं इंडस्ट्रीतल्या काही अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. मात्र त्याने ब्रिटिश शाही कुटुंबातील लिंडा हिच्याशी लग्न केलं. लिंडाने लग्नानंतर आपलं नाव बदलून पूजा असं ठेवलं.

Sunny Deol : तारा सिंगची खरी पत्नी ब्रिटिश शाही कुटुंबातील; या चित्रपटात दोघांनी केलं एकत्र काम
Deol family
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 18, 2023 | 3:27 PM

मुंबई : 18 ऑक्टोबर 2023 | बॉलिवूडमधील देओल कुटुंबातील नाती अनेकदा चर्चेत येतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्ह स्टोरी तर अनेकांना माहीत आहे. हेमा मालिनी यांच्याही लग्न करताना धर्मेंद्र आधीच प्रकाश कौर यांच्याशी विवाहित होते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुलं आहेत. त्यापैकी सनी देओल आणि बॉबी देओल फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. सनी देओलचीही दोन मुलं आहेत. करण आणि राजवीर अशी त्यांची नावं असून या दोघांनीही वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात नशीब आजमावलं आहे. मात्र या दोघांना अद्याप अपेक्षित यश मिळालं नाही. सनी देओल अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला. त्याचं बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. पण सनी देओलने ब्रिटिश शाही कुटुंबातील लिंडाशी केलं.

लिंडाने सनी देओलशी लग्न केल्यानंतर आपलं नाव बदलून पूजा असं केलं. आज ती पूजा देओल म्हणूनच ओळखली जाते. पूजाच्या वडिलांचं नाव कृष्ण देव महल आणि आईचं नाव जून सारा महल असं आहे. जून या ब्रिटनच्या शाही कुटुंबातील आहेत. पूजा तिच्या सासूप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे. ती सहसा कोणत्या पार्टीत किंवा पुरस्कार सोहळ्यात दिसून येत नाही. मात्र पूजाने ‘यमला पगला दिवाना 2’ या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी आपलं योगदान दिलं होतं.

‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामध्ये सनी देओल, धर्मेंद्र आणि बॉबी देओल या तिघांनी एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. याशिवाय पूजाने सनी देओलसोबत एका चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटाचं नाव ‘हिम्मत’ असं आहे. यामध्ये पूजा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती.

सनी देओल आणि पूजा देओल यांना करण आणि राजवीर ही दोन मुलं आहेत. त्यापैकी राजवीरने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘दोनों’ या चित्रपटातून त्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. मात्र त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला. तर करणसुद्धा इंडस्ट्रीत कार्यरत आहे. मात्र त्यालाही अद्याप अपेक्षित असं यश मिळालं नाही. याउलट सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाने 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला.