
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) हा त्याच्या गदर 2 चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. गदर 2 चित्रपटाबद्दल एक मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळतंय. विशेष म्हणजे सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट हिट ठरलाय. गदर 2 हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. गदर 2 चित्रपट (Movie) 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मात्र, असे असतानाही चित्रपटाने मोठा जलवा केलाय. गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल आणि अमीषा पटेल दिसले.
सनी देओल हा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. नुकताच आता सनी देओल याचा मुलगा राजवीर देओल याच्या दोनो चित्रपटाचे ट्रेलर लाॅन्च झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातूनच राजवीर देओल हा बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसणार. यावेळी राजवीर देओल हा मोठे खुलासे करताना देखील दिसला आहे.
राजवीर देओल याचे बोलणे ऐकून सनी देओल याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. राजवीर देओल म्हणाला की, मी ज्यावेळी अभिनेता होण्याचे ठरवले, त्यावेळी माझ्या या निर्णयाला माझ्या पालकांचा मोठा विरोध झाला. त्यांचे म्हणणे होते की, तू अभ्यास करत किंवा अजून काही कर. परंतू अभिनेता होऊ नको. त्यांनी मला कडाडून विरोध केला.
मला अभिनयासोबतच प्रेम झाले. मी अभिनय क्षेत्रामध्ये यावे, अशी घरच्यांची मुळीच इच्छा नव्हती. राजवीर देओल पुढे म्हणाला, माझ्या पालकांचे स्वप्न होते की, मी अभ्यास करून इतर कोणत्याही क्षेत्रात जावे. माझ्या वडिलांना तब्बल 22 वर्षांनंतर हिट चित्रपट मिळाला. माझे नशीब वाईट की, मला अभिनयासोबतच प्रेम झाले. मला वाटते की, आपले काम बोलते, कामामुळेच आपल्याला संधी मिळतात.
मी जर माझ्या कामामध्ये चांगला असेल तर मला नक्कीच संधी मिळेल. मला वाटते की, आपण आपल्या क्राफ्टवर काम करायला हवे.आता राजवीर देओल याने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. राजवीर देओल याचा दोनो चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किरण देओल यानेही काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.
आता सनी देओल याचा लेक राजवीर देओल हा बाॅलिवूडमध्ये काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. नुकताच सनी देओल याने गदर 2 चित्रपटाच्या सक्सेसची खास पार्टी ठेवली होती. विशेष म्हणजे या पार्टीला बाॅलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. सनी देओल याच्या या पार्टीला शाहरूख खान हा देखील पोहचला होता.