VIDEO : सपना चौधरीच्या गाण्यावर सनी लिओनीचा नागिन डान्स

VIDEO : सपना चौधरीच्या गाण्यावर सनी लिओनीचा नागिन डान्स

मुंबई : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने जबरदस्त नागिन डान्स केला आहे. सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. सनीचा हा नागिन डान्स आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. सपना चौधरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सनीच्या नागिन डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सनी थिरकताना दिसत आहे.

सपना चौधरी तिच्या डान्समुळे आज संपूर्ण देशात लोकप्रिय झाली आहे. तिने आतापर्यंत अनेक पंजाबी, भोजपुरी, हरियाणवी सिनेमे गाजवले आहेत. तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तरुणांमध्येही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

 

View this post on Instagram

 

#desiqueen new #tiktok video 😍😍😘😘😘 #sapnachaudhary #sapnachoudhary

A post shared by Sapna Choudhary (@isapnachaudhary) on

सपनाचं ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे गाणं इतकं हीट झालं की, आज कुठलीही पार्टी या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही तिच्या या गाण्याचे फॅन आहेत. अनेकजण युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर या गाण्याचे व्हिडीओ बनवून शेअर करत असतात. सपना चौधरीचा कुठलाही स्टेज शो या गाण्याशिवाय संपत नाही.

‘बिग बॉस-11’पासून संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केलेल्या सपना चौधरीने ऑर्केस्ट्रा पार्टीमधून करिअरची सुरुवात केली होती. ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्याने सपनाला इंडस्ट्रीमध्ये जागा मिळवून दिली. हे गाणं तिची ओळख बनलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *