राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहिली, संपत्तीवर दाखवला हक्क, अखेर न्यायालयाचा अभिनेत्रीला दणका

उच्च न्यायालयाने मुंबई सत्र न्यायालयाच्या 2017 च्या आदेशाला आव्हान देणारी अनिता अडवाणी यांची याचिका फेटाळली आहे. त्यांनी केलेला दावाही यावेळी फेटाळून लावण्यात आला आहे. नेमकं काय घडलं?

राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहिली, संपत्तीवर दाखवला हक्क, अखेर न्यायालयाचा अभिनेत्रीला दणका
Rajesh Khanna anita advani case
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 5:35 PM

दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना याचं खासगी जीवनही प्रचंड चर्चेमध्ये राहिलेलं आहे. त्यांच्यासोबत असलेल्या नात्याला लग्नाची मान्यता मिळावी, यासाठी अभिनेत्री अनिता अडवाणी अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. पण आता त्यांच्या या लढ्याला सर्वोत्त न्यायालयातही मोठा धक्का मिळाला आहे. आज 29 ऑक्टोबर 2026 रोजी सुप्रीम कोर्टाने अनिता यांची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने या सर्व प्रकरणावर बोलताना याला लक्झरी लिटिगेशन (ऐषोआराम, विलासी) असं म्हटलं आहे. दरम्यान, राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्यातून आपल्याला सन्मानाची अपेक्षा असल्याचा युक्तिवाद अनिता यांच्या वकिलांनी केला होता. पण या याचिकेवर सुनावणीसाठीही न्यायालयाने नकार दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

अनिता अडवाणी यांच्या याचिकेवर विचार करण्यासाठी कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने सांगून या प्रकरणाला ‘लक्झरी लिटिगेशन’ असे संबोधले आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे.

Loading...

कायदेशिर मान्यता आणि वैयक्तिक सन्मान या दोन गोष्टी वेगळ्या असल्याचा युक्तिवाद अनिता अडवाणी यांच्या वकिलांनी केला होता. दिवंगत राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्याला मान्यता मिळावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. याआधीही मुंबई उच्च न्यायालयानेही 1 एप्रिल 2026 रोजी अनिता अडवाणी यांची याचिका फेटाळली होती.

राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा

आपण अनेक वर्षे राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा अनिता अडवाणी यांनी केला होता. जुलै 2012 मध्ये राजेश खन्ना यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या नात्याला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी अनिता अडवाणी यांनी न्यायालयीन खटला चालवला. यावेळी त्यांनी राजेश खन्ना यांच्या पत्नी डिंपल कपाडिया, मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार यांच्यावर आपल्याला राजेश खन्ना यांच्या वांद्रे येथील आशीर्वाद बंगल्यातून बाहेर काढल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणानंतर अडवाणी यांनी 2013 मध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यांनी मासिक पोटगी आणि वांद्रे परिसरात तीन बेडरूमचा फ्लॅट मिळावा, अशी मागणी केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us