
‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता आणि ‘झापूक झुपूक’ फेम सूरज चव्हाण सध्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. सूरज चव्हाणच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. २९ नोव्हेंबरला सूरज आपल्या मामाची मुलगी संजनाशी लग्न करणार आहे. लग्नानंतर सूरज आपल्या नव्या, अलिशान घरात संजनासोबत संसार थाटणार आहे. सध्या दोघांच्या लग्नपूर्वी होणाऱ्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये संजनाचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला आहे.
नेमका काय आहे व्हिडीओ?
सूरज आणि संजनाची लग्नगाठ आता एक दिवसावर येऊन ठेपली आहे. लग्न ठरल्यापासूनच या जोडप्याचे केळवण, खरेदी आणि आता लग्नापूर्वीच्या विधींचे व्हिडीओ सतत व्हायरल होत आहेत. आता तर संजनाच्या घरी पार पडलेला ‘घाणा भरण्याचा’ कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्यात संजनानं हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर दागिने आणि केसात गजरा असा पूर्ण साजश्रृंगार केला आहे. या लूकमध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान फिरतोय आणि नेटकरी कमालीचे कौतुक करत आहेत.
कुठे होणार सूरजचा लग्न सोहळा?
सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरता असताना एकदा ब्रेकअप विषयी बोलला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणतीही मुलगी नव्हती. आता सूरज चव्हाणचं हे लव्ह मॅरेज आहे. तो आपल्या चुलत मामाच्या मुलीशीच लग्न करत आहे. दोघांचं लग्न पुण्याजवळील सासवडमध्ये मोठ्या दिमाखात होणार आहे.
सूरज चव्हाणविषयी
‘बिग बॉस मराठी ५’ चं विजेतेपद पटकावल्यानंतर सूरज चव्हाण एका रात्रीत स्टार झाला. त्यानंतर ‘झापूक झुपूक’ सिनेमाने त्याला घराघरात पोहोचवलं. विजेतेपदाच्या बक्षिसाबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला नवं घर बांधून देण्याचं जाहीर वचन दिलं होतं. ते वचन अजितदादांनी पूर्ण केलं आणि सूरजला आता पत्र्याच्या घरातून थेट महालासारख्या भव्य घरात राहण्याची संधी मिळाली आहे. आता या नव्या घरात संजनासोबत सूरजच्या आयुष्याला नवं वळण लागणार आहे.