Suraj Chavan : अजित पवार ते रितेश देशमुख.. सुरज चव्हाण याच्या लग्नाला कोण-कोण येणार ? त्या खास नावाने वेधलं लक्ष

सुरजच्या या शाही विवाहसोहळ्याला कोण-कोण हजेरी लावणार, याचंही औत्सुक्य लोकांच्या मनात आहे. विविध सेलिब्रिटी, राजकीय नेते वगैरे कोण-कोण सुरूज-संजनाला शुभेच्छा द्यायला येणार हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांना आहे

Suraj Chavan : अजित पवार ते रितेश देशमुख.. सुरज चव्हाण याच्या लग्नाला कोण-कोण येणार ? त्या खास नावाने वेधलं लक्ष
सुरज चव्हाण याच्या लग्नाची पत्रिका व्हायरल
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 28, 2025 | 2:26 PM

बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, प्रसिद्ध रील स्टार,अनेकांचा लाडका सुरज चव्हाण (Suraj Chavan) हा त्याच्या आयुष्याची नवी सुरूवात करत आहे. संजना गोफणे हिच्याशी त्याचा उद्या (शनिवार, 29 नोव्हेंबर) विवाह होणार असून संध्याकाळी 6.11 चा मुहूर्तही समोर आला आहे. मात्र त्यापूर्वीच सकाळी सुरज-संजनाचा साखरपुडा होणार असून नंतर हळदही पार पडेल. त्याच्या लग्नाचे एकेक विधि सुरू झाले असून काल त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या हातावर सुरजच्या नावे सुरेख मेहंदी देखील सजली. त्याचे अनेक फोटो समोर आले असून झापूक-झुपूक सुरज-संजनाच्या लग्नासाठी सगळेच उत्सुक आहेत.

मात्र असं असतानाच आत सुरजच्या या शाही विवाहसोहळ्याला कोण-कोण हजेरी लावणार, याचंही औत्सुक्य लोकांच्या मनात आहे. विविध सेलिब्रिटी, राजकीय नेते वगैरे कोण-कोण सुरूज-संजनाला शुभेच्छा द्यायला येणार हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांना आहे. त्यातच सुरज-संजनाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली असून , या लग्नासाठी कोणा-कोणाल निमंत्रण दिलंय त्याची संपूर्ण यादीच समोर आली आहे ना राव. राजकीय नेते, मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध कलाकारा, गायक अशी मोठमोठी नावं त्यात असून एका विशेष नावाने तर सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

सुरजच्या लग्नाची गेस्ट लिस्ट समोर

सोशल मीडियावर सुरच्या लग्नाची पत्रिका, त्यांचं विवाह स्थळ, मुहूर्त अशी सगळी माहिती उघड झाली असून त्याच्या लग्नाला येणाऱ्यांची गेस्ट लिस्टही समोर आली आहे. त्यात राजकीय नेत्यांपासून अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. उद्या, 29 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुरज- संजनाच्या लग्नासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यापासून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्यांचे नाव आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांची पत्नी सुनित्रा पवार,सुप्रिया सुळे, विजय शिवतारे, संजय जगताप अशोक टेकवडे,राजकीय क्षेत्रातील अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती लग्नाला असेल.

Suraj Chavan Wife Mehendi : संजनाच्या हातावर लागली सुरज चव्हाणच्या नावाची मेहंदी ! खास डायलॉगने वेधलं लक्ष

तर मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार्स, अनेक कलाकार हेही गेस्ट लिस्टमध्ये असून त्यांच्याबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे. सुरज सोबत बिग बॉस मराठी 5 व्या सीझनमध्ये असलेल्या अनेक कलाकारांनाही यात निमंत्रण देण्यात आलं असून, त्यातले किती जण येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Suraj Chavan : ‘सुरज, तुला…’ सूरज चव्हाण याच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवारांची खास कमेंट

त्या नावाने वेधलं लक्ष

सूरजची लग्नपत्रिका व्हायरल झाली असून त्यामध्ये बॉलिवूज कलाकाराच्या नावाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, तो कलाकार म्हणजे खिलाडीकुमार,अभिनेता अक्षय कुमार. तसेच रितेश देशमुख,अशोक सराफ, पंढरीनाथ कांबळे,सुरजला चितत्रपटातून ब्रेक देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे, वर्षा उसगांवकर यांच्या नावाचाही त्यात समावेश आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या सीझनमधील त्याचे इतर साथीदरा त्यांचीही नावं गेस्ट लिस्टमध्ये आहेत. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, आर्या जाधव, इरीना, अभिषेक करंगुटकर, अरबाज पटेल, निखिल दामले, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, संग्राम चौगुले, पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, घनश्याम दरोडे, अंकिताचा नवरा कुणाल भगत आणि उत्कर्ष शिंदे यांसारख्या अनेकांचटा त्यामध्ये उल्लेख आहे. त्याचं लग्न हा मोठा सेलिब्रिटी इव्हेंट ठरणार असून आता कोण-कोण लग्नाला येऊन सुरजृसंजनाला शुभेच्छा देतंय हे पाहण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.