Suraj Chavan Wife Mehendi : संजनाच्या हातावर लागली सुरज चव्हाणच्या नावाची मेहंदी ! खास डायलॉगने वेधलं लक्ष
Suraj Chavan : बिग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. शनिवारी 29 नोव्हेंबरला त्याचा संजना गोफणे हिच्याशी विवाह होणार असून त्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. लग्नाआधीच्या विधींनी सुरूवात झाली असून नुकतीच संजनाच्या हातावर सुरजच्या नावाची मेहंदी काढण्यात आली. त्यात एक खास मेसेजही लिहीण्यात आला होता.

बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) याचं नवं घर तयार असून त्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच त्याने शेअर केला. पत्र्याची खोली ते आलिशान बंगला असा त्याचा घराचा कायापालट झाला असून तो व्हिडीओ पाहून चाहते खूप खुश झाले. त्यांनी भरभरून कमेंट्स करत सुरजला शुभेच्छा दिल्या, मात्र आता त्याचे चाहते आणखीनच उत्सुक आहेत, त्यामागचं खास कारण म्हणजे त्यांच्या लाडक्या सुरजचं लग्न जवळ आलंय. अवघ्या 2 दिवसांनी , 29 नोव्हेंबरला सुरज चव्हाणचं संजना गोफणे हिच्याशी लग्न होणार असून त्याआधीच्या विधींनाही सुरूवात झाली.
सुरज-संजनाचा प्री-वेडिंग शूटचा व्हिडीओ फोटो नुकतेच समोर आले, त्याला भरभरून लाईक्स मिळाले. तर आता सुरजची होणारी पत्नी संजना हिच्या हातावर लग्नासाठी सुरेख मेहंदी काढण्यात आली असून त्याचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ते पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.
Suraj Chavan : गुलिगत किंग सुरज चव्हाण चढणार बोहल्यावर… लग्नपत्रिका सर्वात हटके, तुम्ही पाहिली का?
संजनाच्या हाती सुरजच्या नावाची मेहंदी
29 तारखेा संध्याकाळी 6 च्या आसपास सुरज-संजना यांचं लग्न होणार असून त्याच दिवशी आधी दुपारी साखरपुडा आणि नंतर हळद समारंभ होणार आहे. तर लग्नााआधी संजना हिच्या हातावर सुरजच्या नावे सुरेख मेहंदी काढण्यात आली आहे. पारंपारिक पद्धतीने काढलेली मेहंदी , भरलेले हात, यासह तिच्या एका हाताच्या तळव्यावर ‘सुरज-संजना’ असं लिहीण्यात आलं आहे. तर दुसऱ्या हाताच्या तळव्यावर लिहीलेल्या खास मेसेजनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरज हा सगळीकडे ‘झापुक-झुपूक’ हा डायलॉग म्हणत असतो. एवढंच नाही तर बिग बॉस मराठी जिंकल्यावर त्याला जो पहिला पिक्चर मिळाला, त्याचं नावही ‘झापुक-झुपूक’ होतं. केदार शिंदे यांनी तो दिग्दर्शित केलेला चित्रपट होता. त्यामुळे सुरजची होणारी पत्नी संजना हिच्या एका हातावरही ‘झापुक-झुपूक’ असं लिहीलेलं आहे. तिच्या मेहंदीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत असून हे डायलॉग्स, सुंदर मेहंदी आणि तिचा हसरा चेहरा या सर्वांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

अरेंज की लव्ह मॅरेज
बऱ्याच लोकांना माहीत नसले पण सुरज चव्हाण आणि संजना यांचं लव्ह मॅरेज आहे. संजना ही सुरजच्या चुलत मामाची मुलगी आहे, लहानपणापासून ते दोघे एकमेकांना ओळखताता आणि आता ते आयुष्यभराचे जोडीदार होणार आहेत. सुरज हा गोफणे कुटुंबाचा जावई होणा आहे. 29 नोव्हेंबर रोजी शनिवारी संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी माऊली गार्डन हॉल, (गोटेमाळ) खळद, सासवड-जेजुरी रोड, येथे दोघांचं लग्न होणार आहे. सूरज संजनाच्या विवाहासाठी, त्यांचे फोटो, व्हिडीओ पाहण्यासाठी आणि सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
