AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय आणि विवेकच्या नात्याबद्दल मला.. सुरेश ओबेरॉय यांचे थेट मोठे विधान, म्हणाले, मी

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले आहे. ऐश्वर्या राय हिने बॉलिवूडला हीट चित्रपट दिले. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या यांनी काही दिवस एकमेकांना डेट केले.

ऐश्वर्या राय आणि विवेकच्या नात्याबद्दल मला.. सुरेश ओबेरॉय यांचे थेट मोठे विधान, म्हणाले, मी
Aishwarya Rai and Vivek Oberoi
| Updated on: Aug 03, 2026 | 3:41 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असलेले नाव आहे. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हीट चित्रपट केले. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करत ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून झाली. मात्र, त्यापूर्वी तिचे खासगी आयुष्य तूफान चर्चेत होते. सलमान खान याला तिने डेट केले. मात्र, सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर तिच्यासाठी अत्यंत खतरनाक काळ होता. विवेक ओबेरॉय याला सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर तिने डेट केले. काही दिवस दोघेसोबत होते. आता पहिल्याच विवेक ओबेरॉय याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी मोठे भाष्य केले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मला या नात्याबद्दल कधीच माहिती नव्हती. विवेक कधी यावर बोललाच नाही. मला राम गोपाल वर्मा यांनी याबद्दल सांगितले होते. त्यापूर्वीही एक जण मला बोलला होता.

सुरेश ओबेरॉय यांनी म्हटले की, यापैकी बऱ्याच गोष्टी मला माहिती नव्हत्या. मला ज्यावेळी कळाले, त्यावेळी मी याबाबत विवेकसोबत बोललो होतो. मी त्याला सांगितले होते की, तू असे करू नकोस. लेहरेन रेट्रोला सुरेश ओबेरॉय यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते पहिल्याच ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसले.

यादरम्यानच त्यांनी सलमान खान आणि सलीम खान यांच्यासोबत असलेल्या नात्यावरही भाष्य केले. आम्ही सगळेच एकमेकांना खूप छान ओळखतो. विवेकच्या त्यावेळीच्या प्रकरणात मी देखील होतो. मी ज्यावेळी सलमान खानला भेटलो, त्यावेळी तो कायमच त्याची सिगारेट लपवतो आणि आदराने तो माझ्यासोबत गप्पा मारतो.

मी सलीम खान यांचा आदर करतो. मी विवेकला सांगितले आहे की, जेव्हाही सलीम भाई यांना भेटशील, त्या प्रत्येक वेळी अगोदर त्यांच्या पाय पडत जा. सुरेश ओबेरॉय यांनी इतक्या वर्षांमध्ये पहिल्याच विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यावर भाष्य केले. सलमान खान याला ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांचे नाते अजिबात पटले नव्हते. सलमान खान याने मोठा गोंधळ अनेकदा घातला होता.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी