‘Sushant Singh Rajput चा दुसरा जन्म तर नाही’, व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी हैराण

व्हायरल व्हिडीओ आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं खास कनेक्शन.. 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल.... सर्वत्र अभिनेत्याची चर्चा..

'Sushant Singh Rajput चा दुसरा जन्म तर नाही', व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी हैराण
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 3:53 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नसला तरी अभिनेत्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला तीन वर्ष उलटली आहेत. तरी देखील चाहत्यांच्या मनात सुशांतबद्दल असलेलं प्रेम कमी झालेलं नाही. आज देखील चाहते सुशांत सिंह राजपूत याच्या जुन्या आठवणी ताज्या करत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून चाहत्यांना अभिनेत्याची आठवण येत असल्याचं कळत आहे. सध्या सर्वत्र एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून त्या व्हिडीओचा संबंध सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत..

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे चाहत्यांच्या मनात सुशांत सिंह राजपूत याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सोशल मीडियावर ज्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो हुबेहूब सुशांत सिंह राजपूत याच्यासारखा दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. ज्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्या तरुणाचं नाव सॅकी पाड्या असं आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त सुशांत सारख्या दिसणाऱ्या तरुणाची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या लूकसारख्या सॅकी पाड्याने जून 2020 मध्ये इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांना तो प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत सुशांतबद्दल असलेल्या आठवणी ताज्या केल्या आहेत..

व्हिडिओमध्ये दिसणारा सॅकी पाड्या हुबेहूब सुशांतसारखा दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. सॅकी पाड्या याच्या व्हिडीओवर एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘सुशांत परत आला आहे’, तर दुसरा युजर म्हणाला, ‘सुशांतचा दुसरा जन्म तर नाही..’, तर तिसरा युजर म्हणतो, ‘हा तर सुशांतचा लहान भाऊ दिसत आहे..’ सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सुशांत सिंह याच्यासारख्या दिसणाऱ्या सॅकी पाड्याची चर्चा रंगत आहे..

सुशांत सिंह राजपूत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने तीन वर्षांपूर्वी स्वतःचं आयुष्य संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. एवढंच नाही तर, सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर वादग्रस्त परिस्थिती देखील निर्माण झाली. पण तीन वर्षांनंतर देखील अभिनेत्याच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही..

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.