बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने भोगला तुरुंगवास; म्हणते, ‘काळी जादू…’

Actress Life Style: प्रसिद्ध आभिनेत्रीने बॉयफ्रेंडच्या निधनानंतर भोगला तुरुंगवास, आता नाही मिळत काम, कसा भागवते खर्च? अभिनेत्री म्हणाली, 'काळी जादू...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...

बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने भोगला तुरुंगवास; म्हणते, काळी जादू...
| Updated on: Jul 22, 2024 | 1:02 PM

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला. गंभीर आरोपांमुळे अभिनेत्रींला तुरुंगात देखील जावं लागलं. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री रिया चक्रवर्ती. रिया हिला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर पोलिसांनी अटक केली होती. जवळपास 1 महिना अभिनेत्री तुरुंगात होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रिया हिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. पण त्यानंतर कोणत्याच सिनेमात रिया दिसली नाही.

सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणाला आत 4 वर्ष झाली आहेत. तरी देखील रिया हिचं करियर योग्य मार्गावर आलेलं नाही. नुकताच अभिनेत्रीने पॉडकास्टमध्ये  हिने स्वतःबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी पैसे कसे कमावते, माझा खर्च कसा भागतो… हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण माझ्याकडे काम नाही… मी सिनेमांपासून दूर आहे पण दुसऱ्या गोष्टी देखील करत आहे.’

‘मी आता मोटिव्हेशनल स्पिकिंगचा प्रयत्न करत आहेत.  याच माध्यमातून मी पैसे कमावत आहे. माझ्या पॉडकास्टचं नाव माझ्या आयुष्याशी प्रेरित आहे. प्रत्येकाला ‘चॅप्टन 1′ माहिती आहे. मी अनेक संकटांचा सामना केला आहे.’

 

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझा हा दुसरा जन्म आहे आणि मला माझा दुसरा जन्म साजरा करायचा आहे. मी अनेकदा सांगितलं आहे की, आष्यात दुसऱ्यांदा नव्याने सुरुवात करावी लागते. तेव्हाच तुम्ही आयुष्यात मूव्हऑन करू शकता. लोकं माझा नाही तर, मी ज्याप्रकारे माझं व्यक्तीमत्व घडवलं आहे, त्याचा द्वेष करतात.’

‘लोकांना माझं व्यक्तीमत्व आवडत नाही. वेग-वेगळ्या नजरेने ते माझ्याकडे पाहात असतात. मला आता असं वाटत की माझ्याकडे सुपर पॉव्हर आहे. जेव्हा मी कोणत्या रुममध्ये जाते तेव्हा काही लोकांचं म्हणणं आहे की, मी काही तरी केलं आहे. मी हडळ आणि मी काळी जादू करते…’

‘तर काही लोकं म्हणतात मुलीने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. कोणत्याही गोष्टीचा समना करण्याचा बळ तिच्या एकटीमध्ये आहे. मला आता कसलाच फरक पडत नाही. जी लोकं माझ्यावर प्रेम करतात त्यांना माहिती आहे मी कशी आहे?’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.