AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dil Bechara Trailer | सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर लाँच

जॉन ग्रीनच्या 2012 मधील बेस्टसेलर 'द फॉल्ट इन अवर स्टार्स'वर आधारित 2014 मध्ये प्रदर्शित त्याच नावाने आलेल्या हॉलिवूडपटाचा हा अधिकृत रिमेक आहे. (Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara Trailer Launch)

Dil Bechara Trailer | सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा'चा ट्रेलर लाँच
| Updated on: Jul 06, 2020 | 4:22 PM
Share

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सुशांतसिंह, संजना संघी, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला मुकेश छाब्रा दिग्दर्शित हा सिनेमा 24 जुलैला ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे. (Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara Trailer Launch)

‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘दिल बेचारा’ रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा सबस्क्रायबर्ससह नॉन- सबस्क्रायबर्सनाही उपलब्ध असेल. जॉन ग्रीनच्या 2012 मधील बेस्टसेलर ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’वर आधारित 2014 मध्ये प्रदर्शित त्याच नावाने आलेल्या हॉलिवूडपटाचा हा अधिकृत रिमेक आहे.

8 मे रोजी हा सिनेमा रिलीज होण्याचे ठरले होते, परंतु कोरोनामुळे तो पुढे ढकलला गेला. 14 जून रोजी सुशांतने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. सुशांतचा अखेरचा चित्रपट म्हणून त्याच्या चाहत्यांसाठी हा भावनिक आणि तितकाच उत्सुकतेचा क्षण आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याऐवजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करावा, अशी मागणी चाहत्यांनी उचलून धरली होती.

ट्विटरवर सकाळपासूनच सुशांतसिंह राजपूत आणि ‘दिल बेचारा’ चित्रपटाशी संबंधित पोस्ट्स पाहायला मिळत आहेत. चाहते ट्रेलर ऑनलाईन रिलीज होण्याची वाट पाहत होते. अखेर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आठवणींना उजाळा दिला. (Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara Trailer Launch)

पहा ट्रेलर :

स्वस्तिका मुखर्जी, जावेद जाफेरी, मिलिंद गुणाजी आणि साहिल वैद यांच्याही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सैफ अली खान पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

(Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara Trailer Launch)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.