Sushant Singh Suicide Investigation | सुशांत आत्महत्या प्रकरणात 'या' अभिनेत्रीची चौकशी

मुकेश छाब्रा यांच्या जबाबात अभिनेत्री संजना संघीचा उल्लेख झाल्याने आता पोलिसांनी तिला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.

Sushant Singh Suicide Investigation | सुशांत आत्महत्या प्रकरणात 'या' अभिनेत्रीची चौकशी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. सुशांतने चित्रीकरण केलेला अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’मधील त्याची सहअभिनेत्री संजना संघी हिची आज चौकशी होणार आहे. (Actress Sanjana Sanghi Inquiry in Sushant Singh Rajput Suicide Investigation)

सुशांत आणि संजना हे जवळचे मित्र होते. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी दोघांना ‘दिल बेचारा’ सिनेमात घेतलं होतं. मुकेश यांच्या जबाबात संजनाचा उल्लेख झाल्याने आता संजनाला पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.

अखेरच्या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सुशांतची मनस्थिती कशी होती, त्याच्या मानसिक आरोग्याविषयी काही कल्पना होती का, यासारखे प्रश्न वांद्रे पोलीस संजना संघीला विचारण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सुशांतच्या पाटणा येथील घरी जाऊन त्याच्या वडिलांची भेट घेतली.  वडिलांचे सांत्वन करताना  नानाही काहीसे भावूक झाले होते. यापूर्वी तेजस्वी यादव, सुशील कुमार मोदी, रवी शंकर प्रसाद आणि मनोज तिवारी या नेत्यांनी सुशांतच्या घरी भेट दिली होती. तर भोजपुरी सिनेसृष्टीतील कलाकार पवन सिंग, खेसारी लाल यादव, राकेश मिश्रा आणि अक्षरा सिंग यांनीही सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) हा येत्या 24 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

14 जूनला सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या अंतिम शवविच्छेदन अहवालात गुदमरुन मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 17 जणांचे जबाब घेतले आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

पोलिसांनी आतापर्यंत कोणा-कोणाचे जबाब नोंदवले

 • के. एल. सिंग, सुशांतचे वडील
 • नितू सिंग, बहीण
 • मीतू सिंग, बहीण
 • सिद्धार्थ पिठानी, आर्ट डायरेक्टर
 • नीरज, सुशांतचा आचारी
 • केशव, सुशांतचा आचारी
 • दीपेश सावंत, केअर टेकर
 • मुकेश छाब्रा, कास्टिंग डायरेक्टर
 • श्रुती मोदी, बिझनेस मॅनेजर
 • राधिका निहलानी, पीआर
 • रिया चक्रवर्ती, प्रेयसी
 • चावी बनवणारा
 • महेश शेट्टी, मित्र
 • केरसी चावडा, सुशांतवर उपचार करणारे डॉक्टर
 • अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानी, कायदेशीर सल्लागार
 • रोहिणी अय्यर, मैत्रीण
 • सुशांतचा सीए
 • संजना संघी, अभिनेत्री

संबंधित बातम्या :

सुशांत गुगलवर सतत आपली बातमी शोधायचा, कारण…..

Sushant Singh Rajput | सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय

सहा वर्षापूर्वी ‘या’ अभिनेत्याचाही सुशांतप्रमाणे गळफास, तेच कारण, तेच वय, तशीच आत्महत्या!

(Actress Sanjana Sanghi Inquiry in Sushant Singh Rajput Suicide Investigation)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *