‘यश मिळाल्यानंतर कान भरणारे बरेच असतात…’, सुशांत सिंह राजपूतबद्दल अंकिता लोखंडे हिचा मोठा खुलासा

Ankita Lokhande : अंकिता हिच्यासोबत कसा वागत होता सुशांत सिंह राजपूत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलं, 'सुशांतला यश मिळालं म्हणून...', सध्या सर्वत्र अंकिता लोखंडे हिच्या वक्तव्याची चर्चा... यश मिळाल्यानंतर सुशांत याच्या वागणुकीवर अंकिता हिने सोडलं मौन...

यश मिळाल्यानंतर कान भरणारे बरेच असतात..., सुशांत सिंह राजपूतबद्दल अंकिता लोखंडे हिचा मोठा खुलासा
| Updated on: Oct 31, 2023 | 9:15 AM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खान याचा ‘बिग बॉस 17’ शो सध्या तुफान चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील पती विकी जैन याच्यासोबत ‘बिग बॉस 17’ शोमध्ये एन्ट्री केली आहे. दरम्यान, बिग बॉसमध्ये अंकिता तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला आहे. ‘सुशांत याला यश तर मिळालं, पण त्याचे कान भरणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी होती…’ असं अंकिता म्हणाली.

मुनव्वर फारुकी यांच्यासोबत संवाद साधत असताना अंकिता लोखंडे हिने एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. सुशांत आणि अंकिता सात वर्ष एकत्र होते. सात वर्षांचं नातं २०१६ मध्ये संपलं आणि अंकितासोबतच तिच्या आई-वडिलांना देखील दुःख झालं.

अंकिता म्हणाली, ‘एका रात्रीत सुशांत अचानक गायब झाला, त्याला यश तर मिळालं, पण त्याचे कान भरणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी होती. त्याच्या मनात माझ्यासाठी प्रेम राहिलं नव्हतं. जेव्हा मी त्याच्याकडे पाहायची तेव्हा मला वाईट वाटायचं… शेवटपर्यंत सुशांतकडून मला ब्रेकअपचं स्पष्टीकरण मिळालं नाही…’

पती विकी जैन याच्याबद्दल देखील अभिनेत्रने मोठं वक्तव्य केलं. ‘विकी माझ्यासोबत भांडत जरी असेल, तर त्याच्या डोळ्यांमध्ये असलेलं माझ्या प्रति प्रेम मी अनभवू शकते. सुशांतने मला सांगितलं असतं, की त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे… त्याला आयुष्यात पुढे जाणं सोपं झालं असतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

अंकिता हिने सुशांत याला शेवटी त्यांच्या ब्रेकअपच्या दिवशी पाहिलं होतं. २०२० मध्ये सुशांत याच्या निधनाबद्दल माहिती झाल्यानंतर अंकिता हिला मोठा धक्का बसला… तेव्हा विकी जैन याने अभिनेत्रीला आधार दिला. आता अंकिता, विकी याच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

अंकिता आणि विकी आता एकमेकांसोबत आनंदी आहेत. पण बिग बॉसमध्ये देखील अनेकदा दोघांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील दोघांची जोडी प्रचंड आवडते.