AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushmita Sen : 10 वर्ष मोठ्या उद्योजकासोबत खासगी फोटो व्हायरल होताच सुष्मिताचे वडील म्हणालेले, ‘माझ्या मुलीच्या आयुष्यातील…’

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने अनेक पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते. पण 10 वर्ष मोठ्या उद्योजकासोबत खासगी फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. ज्यावर अभिनेत्रीच्या वडिलांनी देखील मोठं वक्तव्य केलं होतं.

Sushmita Sen : 10 वर्ष मोठ्या उद्योजकासोबत खासगी फोटो व्हायरल होताच सुष्मिताचे वडील म्हणालेले, 'माझ्या मुलीच्या आयुष्यातील...'
| Updated on: Jun 05, 2026 | 3:31 PM
Share

Sushmita Sen Love Life: अभिनेत्री सुष्मिता सेन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. एक काळ असा होता, जेव्हा सुष्मिता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. सुष्मिता हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत रंगली, पण कोणत्यात सेलिब्रिटीसोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. पण लग्नाआधी अभिनेत्री दोन मुलींची आई झाली. सुष्मिता हिने दोन मुलींना दत्तक घेतलं. आज अभिनेत्री दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत असली तरी, तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या काही. काही वर्षांपूर्वी सुष्मिता हिचे 10 वर्ष मोठ्या उद्योजकासोबत खासगी फोटो व्हायरल झालेले. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. ज्या उद्योजकासोबत सुष्मिता हिचे फोटो व्हायरल झालेले, तो उद्योजक ललित मोदी आहे.

सांगायचं झालं तर, सुष्मिता हिने विवाहित पुरुषांना देखील डेट केलं आहे. पण उद्योजक ललित मोदी याच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला. कारण खुद्द ललित मोदी याने अभिनेत्रीसोबत असलेले खासगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत रिलेशनशिपची कबुली दिली होती. सुष्मितासोबत लग्नाचा विचार करत आहे… असं ललित मोदी फोटो पोस्ट करत म्हणालेला. यावर सुष्मिता हिच्या वडिलांनी देखील मोठं वक्तव्य केलं होतं.

ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला तेव्हा त्यांच्या रिलेशनशिपवर अभिनेत्रीच्या वडिलांनी देखील मौन सोडलं होतं. ‘मला याबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे यावर मी काहीच बोलू शकत नाही. जर असं काही असेल तर, पुढे जाऊन मला नक्की माहिती पडेल. असं काही असेल तर माझ्या मुलीच्या आयुष्यातील नवीन वळण असेल… भविष्यात मला नक्की माहिती पडेल पण आता मला काहीही माहिती नाही…’ असं देखील सुष्मिताचे वडील म्हणाले होते.

सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने जवळपास 11 सेलिब्रिटींनी डेट केलं होतं. सुष्मिता हिने ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुडा, इम्तियाज खत्री, वसीम अकरम आणि मुदस्सर अजीज यांसारख्या 11 जणांना अभिनेत्रीने डेट केलं आहे. अनेक सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर देखील सुष्मिता वयाच्या 50 व्या वर्षी देखील अविवाहित आहे. आता सुष्मिता मॉडेल रोहमन शॉल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा