AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushmita Sen च्या आयुष्यात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मोठे बदल, मुलींनी घेतला मोठा निर्णय

Sushmita Sen | आईला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे सुष्मिता हिच्या दोन्ही मुलींवर परिणाम... 'त्या' घटनेनंतर अभिनेत्रीच्या मुलींनी घेतला मोठा निर्णय... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा

Sushmita Sen च्या आयुष्यात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मोठे बदल, मुलींनी घेतला मोठा निर्णय
| Updated on: Sep 11, 2023 | 9:38 AM
Share

मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिने अनेक सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ‘ताली’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. पण अभिनेत्रीच्या वर्षाच्या सुरुवातीबद्दल सांगायचं झालं तर, २०२३ या वर्षाची सुरुवात अभिनेत्रीसाठी फार भयानक होती. कारण सुष्मिता सेन हिला हृदयविकाराचा झटका आला होता. या गोष्टीची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर असून सुष्मिता हिने कामाला देखील सुरुवात केली आहे.

अभिनेत्रीने आता कामाला सुरुवात केली असली तरी, हृदयविकाराच्या झटक्यामुळे सुष्मिता हिच्या दोन्ही मुलींवर मोठा परिणाम झाला होता. आईची प्रकृती खालावल्यामुळे सुष्मिता हिच्या दोन्ही मुलींनी तिची काळजी घेतली. जुने दिवस आठवत अभिनेत्रीने छोट्या मुलीचं कौतुक केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. सुष्मिता म्हणाली, ‘हृदयविकाराच्या झटक्यामुळे माझ्या दोन्ही मुलींना खूप त्रास झाला. दोघींनी माझी पूर्ण काळजी घेतली. आजही घेत आहेत. विशेषत: लहान मुलगी पूर्ण खचली होती. तिने माझी खूप काळजी घेतली. माझ्या मोठ्या मुलीला तिच्या स्वत:च्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या लहान मुलीने अलार्म लावला आहे. रोज ९ वाजता ती मला औषधं द्यायची. आजही तिने टाईम सेट केला आहे. आजही ती माझी औषधं विसरत नाही. काही काळासाठी ती माझी आई झाली… ती मला नेहमी सांगते की माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही…. सध्या सर्वत्र सुष्मिता हिच्या वक्तव्याची चर्चा आहे.

हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर सुष्मिताने काय झालं होतं, ते चाहत्यांना सांगितलं..’मी फार मोठ्या संकटातून बाहेर आली आहे. मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझ्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज होते. हा माझ्या आयुष्याचा एक टप्पा होता आणि तो आता गेला आहे. माझ्या मनात आता कसलीच भीती नाही..’

सुष्मिता सेन हिचे सिनेमे

सुष्मिता सेन हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्रीची ‘ताली’ वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झाली. आता अभिनेत्री ‘आर्या ३’ सीरिजमध्ये दिसणार आहे. सुष्मिता कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. त्यामुळे अभिनेत्री ‘आर्या ३’ सीरिजची घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना