Nepotism : घे भरारी! सुष्मिता सेनचा लाडक्या लेकीला मोलाचा सल्ला

| Updated on: Jan 12, 2021 | 6:49 PM

सुष्मिता सेनची मुलगी रेनेनं काही दिवसांपूर्वीच 'सुट्टाबाजी' या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. (Sushmita Sen's valuable advice to Renee Sen)

Nepotism : घे भरारी! सुष्मिता सेनचा लाडक्या लेकीला मोलाचा सल्ला
रेने सेन : सुष्मिता सेनची मोठी मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शॉर्ट फिल्ममध्ये दिसली आहे. सुट्टाबाजी या शॉर्ट फिल्ममध्ये ती मुख्य भूमिकेत होती. या शॉर्टफिल्मचं कबीर खुराना यांनी दिग्दर्शन केलं. यात राहुल वोहरा आणि कोमल छाब्रिया मुख्य भूमिकेत आहेत.
Follow us on

मुंबई : सुष्मिता सेनची मुलगी रेनेनं काही दिवसांपूर्वीच ‘सुट्टाबाजी’ या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. या चित्रपटात रेनेनं एका टीनेजरची भूमिका साकारली आहे जी घरी धूम्रपान करण्याचे मार्ग शोधत असते आणि ती तिच्या पालकांकडून ही गोष्ट लपवू इच्छिते. या संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग लॉकडाऊनमध्ये झालंय त्यामुळे या शॉर्टफिल्मची मोठी चर्चा रंगली. आता अलीकडेच एका मुलाखती दरम्यान रेनेनं नेपोटिझम विषयी भाष्य केलं आहे. रेने म्हणाली की तिला चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चं स्थान मिळवायचं आहे.

एनडीटीव्हीशी बोलताना रेने म्हणाली, ‘मला माहिती आहे की मी खूप भाग्यवान आहे. या क्षेत्रात मोठं होण्यासाठी किंवा कलाकार होण्यासाठी लाखो लोक मुंबईत येतात. त्यामुळे जर मी माझ्या कामाशी प्रामाणिक नसेल तर ते चुकीचे ठरेल.’ रेने पुढे म्हणाली, ‘माझी आई नेहमीच सांगते की तुम्हाला तुमचं काम योग्य पद्धतीनं करता आलं पाहिजे. माझी मुलगी असल्याचा फायदा करुन घेऊ नको. माझी मुलगी असल्यानं तु दुसर्‍याची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी ती जागा मिळवण्यासाठी पूर्णपणे मेहनत घेत आहे.’

यापूर्वी हिंदुस्तान टाईम्स ब्रंचला दिलेल्या मुलाखतीत रेनेनं तिच्या अभिनयातील डेब्यूवर तिच्या आईची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं होतं. ही शॉर्टफिल्म पाहिल्यानंतर सुष्मिताच्या डोळ्यात अश्रू आले होते. तर लहान बहीण खूप खूश होती आणि रोहमन अंकलला माझा अभिमान वाटत होता.

सुष्मिताच्या बॉयफ्रेंडबद्दल रेनेला काय वाटतं…
रेने सुष्मिताचा बॉयफ्रेंड रोहमनबद्दल बोलताना म्हणाली, “तो आमच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करतो.” आम्ही दररोज त्याच्याकडून काहीतरी शिकत असतो. त्याच्या कुटुंबातील परंपरा शिकण्यासारख्या आहेत. तो खूप सपोर्टिव्ह आहे. तो जे काही बोलतो ते तो करतो. तो खूप कमी बोलतो आणि जेव्हा तो काही बोलतो तेव्हा ते खूप खास असतं. ‘

संबंधित बातम्या 

Fact Check | सोशल मीडियावरील ‘तो’ फोटो खरंच विरुष्काच्या लेकीचा?

‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगनाविरोधात जोरदार आंदोलन, लोक म्हणाले परत जा, परत जा…!