Fact Check | सोशल मीडियावरील ‘तो’ फोटो खरंच विरुष्काच्या लेकीचा?

सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो विरुष्काच्या बाळाचा असल्याचे सांगितले जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:21 PM, 12 Jan 2021
Virat kohli Anushka sharma Daughter baby first photo viral on social Media

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी काल (11 जानेवारी) चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. विराट कोहलीने सोमवारी ट्विटवरून ही गोड बातमी दिली होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो विरुष्काच्या बाळाचा असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोत केवळ बाळाचे पाय दिसत असल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे (Virat Anushka’s daughter first photo fact check).

विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली याने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत लहान बाळाचे पाय दिसत आहेत. ‘Happiness overboard… Angel in the house’, असे कॅप्शन या फोटोसोबत लिहले आहे. त्यामुळे हा फोटो विराट-अनुष्काच्या लेकीचाच असावा असा अंदाज सगळ्या चाहत्यांनी बांधला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Kohli (@vk0681)

नाही, तो फोटो विरुष्काच्या लेकीचा नाही!

हा फोटो कमालीचा चर्चेत आला आहे. परंतु, स्टार कपलच्या मुलीचा हा खरोखर पहिला फोटो आहे का?, असा प्रश्नही अनेकांना पडला होता. हा फोटो रिपोस्ट करत लोकांनी त्याला ‘विरुष्का’ असे नावही दिले. मात्र, फोटो गुगलवर सर्च केला असता, तो स्टॉक फोटो असल्याचे लक्षात येते. त्यामुळे हा चर्चित फोटो विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीचा नाही. तिच्या फोटोसाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

स्टॉक फोटोचा उपयोग

स्टॉक फोटो हे व्यावसायिक दर्जाची छायाचित्रे आहेत. जी खरेदी केली जाऊ शकतात आणि व्यवसाय किंवा सर्जनशील हेतूंसाठी वापरली जाऊ शकतात. स्टॉक छायाचित्रांचा डेटाबेस- लहान मुलाच्या पायांचा हा खास फोटो शटरस्टॉक येथे खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. “नवजात बालकाच्या पायाचे क्लोजअप शॉट” या विभागातील हा चर्चित फोटो छायाचित्रकार अँटोनियो व्ही ओक्विआस यांनी काढला आहे (Virat Anushka’s daughter first photo fact check).

प्रायव्हसी महत्त्वाची!

लेकीच्या आगमनाची बातमी शेअर करताना, ‘आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघींची प्रकृती ठीक आहे. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचं सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे’, असे ट्विट विराट कोहलीने केले होते.

सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय

अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.

(Virat Anushka’s daughter first photo fact check)

हेही वाचा :

Virat Anushka Daughter | विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

विराट कोहलीला मुलगी होणार! वाचा कुणी आणि कुठल्या आधारे केला दावा

‘त्या’ ज्योतिषची भविष्यवाणी खरी ठरली, विराट-अनुष्काला कन्यारत्न