Swara Bhaskar : तुमची निराशा होणार नाही, पतीला उमेदवारी जाहीर होताच स्वरा भास्करची खास पोस्ट

अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गाटतून अणुशक्तीनगरमधून उमेदवारी मिळाली आहे. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून सना मलिक यांना तिकीट मिळालं असून चुरशीची लढाई होणार आहे.

Swara Bhaskar : तुमची निराशा होणार नाही, पतीला उमेदवारी जाहीर होताच स्वरा भास्करची खास पोस्ट
पतीला उमेदवारी जाहीर होताच स्वरा भास्करची खास पोस्ट
Image Credit source: social media
| Updated on: Oct 28, 2024 | 10:18 AM

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सध्या अनेक तरूण चेहरे उतरलेले दिसत आहेत. शरद पवार यांनीही यंग ब्रिगेडला मैदानात उतरवलं असून त्यांच्या पक्षातर्फे अनेक तरूण चेहऱ्यांना संधि देण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे अणुशक्तीनगरमधून उमेदवारी मिळालेले फहाद अहमद. त्यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांची पत्नी व अभिनेत्री स्वरा भास्कर हिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून नवाब मलिक यांची कन्या, सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ही लढत चुरशीची होताना दिसणार आहे. राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी असा हा सामना रंगणार असून जनता कोणाच्या पारड्याच विजयाची माळ टाकेल हे 23 तारखेलाच स्पष्ट होईल.

दरम्यान पतीला विधानसभा निवडणूकीची उमेदवारी जाहीर होताच स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीत शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांचे आभार मानले आहेत.

काय आहे स्वरा भास्कर हिची पोस्ट ?

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने X या सोशल मीडिया साईटवरील तिच्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. तिने शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, आणि अबू आझमी यांचे आभार मानले आहेत. तो ( फहाद) चांगला मुलगा आहे… तुमची निराशा होणार नाही असे म्हणत तिने स्वराने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

 

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. विविध पक्षांचे दिग्गज नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. यापैकी अनेक नेत्यांना शरद पवारांनी त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. फहाद अहमद यांनी 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला , मात्र त्यापूर्वीपासूनच ते राजकारण सक्रिय आहेत. त्यांच्यावर समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी होती. त्यामुळे ते त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली, त्यांच्याकडूनच उमेदवार जाहीर करण्यात येणार होता. अखेर फहाद अहमद यांना राष्ट्रवादी शरद पवार गटातून अणुशक्तीनगर येथून विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

फहाद अहमद यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीबद्दल आंदोलन होतं. तसेच फहाद अहमद यांनी सीएए कायद्याच्या विरोधातील रॅलींमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. फहाद अहमद हे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती आहेत. 16 फेब्रुवारी 2023 मध्ये स्वरा आणि फहाद अहमद यांनी लग्न केलं.