2014च्या खऱ्या स्वातंत्र्यानंतर काय अवस्था…; कलमा शिकणाऱ्या भाजप नेत्यावर स्वराचा निशाणा

स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट करून भाजप नेते निशिकांत दुबे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेत्याने पहलगाम हल्ल्यानंतर ट्वीट केले होते की, सध्या मी कलमा शिकत आहे.

2014च्या खऱ्या स्वातंत्र्यानंतर काय अवस्था...; कलमा शिकणाऱ्या भाजप नेत्यावर स्वराचा निशाणा
Nishikant Dubey
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 25, 2025 | 1:34 PM

Swara Bhasker On Nishikant Dubey: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जातात. ती अनेकदा देशातील समाजिक मुद्द्यांवर बोलताना दिसते. अभिनेत्रीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर भाजप नेते निशिकांत दुबे यांनी कलमा शिकण्याबाबत केलेल्या पोस्टवर निशाणा साधला. अभिनेत्रीने म्हटले की, ‘2014 च्या खऱ्या स्वातंत्र्यानंतर काय अवस्था झाली आहे.’

भाजप नेते निशिकांत दुबे यांनी काय केली पोस्ट?

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दुर्दैवी घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी गोळी चालवण्याआधी पुरुषांना त्यांचा धर्म विचारला आणि कलमा बोलण्यास सांगितले होते. भाजप नेते निशिकांत दुबे यांनी पहलगाम हल्ल्यात कलमा न वाचण्याबाबत आणि निरपराध लोकांच्या मृत्यूबाबत सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले होते, “अशहदु अल्लाह इल्लाह इल्लल्लाहु वह दहु ला शरी-क लहू व अशदुहु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु… सध्या मी कलमा शिकत आहे, कधी गरज पडेल कोण जाणे.”
वाचा: शिमला करार नेमका काय आहे? जो रद्द करण्याची धमकी पाकिस्तान देत आहे

भाजप नेत्याच्या पोस्टवर स्वराने साधला निशाणा

भाजप नेत्याच्या पोस्टला री-पोस्ट करत स्वरा भास्करने टोला लगावला आहे. “बघा… 67 वर्षांहून अधिक काळ काँग्रेस सरकारमध्ये हे करावे लागले नाही.. 2014 च्या ‘खऱ्या स्वातंत्र्या’नंतर काय अवस्था झाली आहे..” या आशयाची पोस्ट स्वराने केली आहे.

स्वराच्या पोस्टनंतर भाजप नेते दुबे यांनीही केला पलटवार

स्वराने निशाणा साधल्यानंतर भाजप नेते निशिकांत दुबेही गप्प बसले नाहीत. त्यांनीही पलटवार करत एक्सवर एक पोस्ट केली. त्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टला टॅग करत लिहिले, “धर्म परिवर्तन करणारे मुल्लेही ज्ञान वाटत आहेत.”

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतला मोठा निर्णय

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू जल करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देणे आणि दिल्लीतील पाक उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे यासारख्या पावलांमुळे पाकिस्तानच्या शहबाज सरकारवर दबाव वाढला आहे. भारताच्या या कारवायांना उत्तर म्हणून पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली, ज्यात भारतासारखीच प्रत्युत्तराची पावले उचलण्याची चर्चा झाली. सर्वात धक्कादायक विधान हे होते की पाकिस्तान आता शिमला करार रद्द करण्याची धमकी देत आहे.