
T20 World Cup 2026: 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (IND विरुद्ध NZ) गायक रिकी मार्टिनने उत्कृष्ट सादरीकरण केलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुखबीर सिंगसोबत त्याने स्वतःचा जलवा दाखवला. त्यामुळे सध्या सर्वत्र रिकी मार्टिन याची चर्चा रंगली आहे. पण एक काळ असा होता जेव्हा रिकी मार्टिन, अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्च आलेला. दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या होत्या… तर आता जाणून घ्या रिकी मार्टिन नक्की कोण आहे आणि त्याच्या सुष्मिता हिच्या नात्याचं नक्की काय झालं…
1990 च्या दशकात ‘लॅटिन पॉप एक्सप्लोजन’ ला चालना देण्याचं श्रेय मार्टिनला जातं. ज्यामुळे स्पॅनिश आणि द्विभाषिक संगीत जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. त्यांचं सर्वात मोठं हिट गाणं म्हणजे लिव्हिन ला विडा लोका, द कप ऑफ लाईफ – 1998 च्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणं आणि शी बँग्स… यांसारखी अनेक गाणी रिकी मार्टिन याच्या नावावर आहेत.
रिकी मार्टिन याच्याबद्दल आणखी काही सांगायचं झालं तर, फक्त गायकच नाही तर, टीव्ही, सिनेमा आणि थिएटरमध्ये त्याने अभिनेता म्हणून देखील अनेक भूमिका बजावल्या आहे… आजही रिकी मार्टिन याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, रिकी मार्टिन याच्या खासगी आयुष्याची चर्चा देखील कायम रंगलेली असते.
रिकी मार्टिन हा सुष्मिता सेनचा कथित एक्स बॉयफ्रेंडअसल्याचं सांगितलं जातं होतं. एवढंच नाही तर, 1990 च्या दशकाच्या मध्यात तिने मिस युनिव्हर्स जिंकल्यानंतर त्यांच्यात काही काळ प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरलेला… पण दोघांनी देखील कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. पण अशी देखील चर्चा होती की, रिकी आणि सुष्मिता एकमेकांचे चांगले मित्र होते… नंतर 2010 मध्ये रिकी मार्टिन याने तो ‘गे’ असल्याची कबुली दिली आणि यासाठी सुष्मिता हिने देखील त्याला पाठिंबा दिला…
सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये करियर करत असताना अभिनेत्रीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अनेक लोकप्रिय अभिनेते, क्रिकेटर एवढंच नाही तर, उद्योजकांसोबत देखील सुष्मिता हिचं नाव जोडण्यात आलं… सध्या अभिनेत्री रोहमन शॉल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळत आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.