
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेला अत्यंत चर्चेत असलेला ‘अस्सी’ हा सिनेमा आज (२० फेब्रुवारी २०२६) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाखालील हा चित्रपट प्रेक्षकांना पहिल्याच दिवशी खूप आवडला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावर प्रशंसेचा वर्षाव होत आहे. अनेकांनी चित्रपटाला ‘भावनिक धक्का देणारा’, ‘थक्क करणारा’ आणि ‘समाजावर विचार करायला भाग पाडणारा’ चित्रपट म्हटलं आहे. चित्रपटाला सुरुवातीलाच चांगले रिव्ह्यूज मिळत आहेत. आता या चित्रपटाची कथा नेमकी कशी आहे? चला जाणून घेऊया…
तापसी पन्नू व्यतिरिक्त ‘अस्सी’ चित्रपटामध्ये मोहम्मद जीशान अय्यूब, नसीरुद्दीन शाह, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, कानी कुस्रुति आणि रेवती यांसारख्या दिग्गज कलाकारांची जबरदस्त टीम आहे. चित्रपटाची कथा एका पीडितेच्या भोवती फिरते, जिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर कोर्टात न्यायाची लढाई लढली जाते.
‘अस्सी’ म्हणजे काय?
‘अस्सी’ हा चित्रपट तीव्र कायदेशीर संघर्षाच्या माध्यमातून समाजातील जटिल प्रश्न उपस्थित करतो. कथा फक्त कोर्टातील वादविवादापुरती मर्यादित राहत नाही, तर नैतिकता, जबाबदारी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याशी निगडित गंभीर मुद्द्यांना स्पर्श करते. रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. या प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहेत.
प्रेक्षक काय म्हणत आहेत?
एकाने लिहिले, “‘अस्सी’ नक्की पाहा. अनुभव सिन्हा यांचे अप्रतिम दिग्दर्शन आणि तापसी व कानी कुस्रुति यांचा जबरदस्त अभिनय तुम्हाला आतून हादरवून टाकेल. तसेच समाजात घडणाऱ्या घटनांवर विचार करायला भाग पाडेल.” तापसी पन्नूच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. एका यूजरने म्हटले, “तापसी फक्त मजबूत भूमिका साकारत नाहीत, तर त्या पात्राच्या दुःख आणि ताकदीच्या प्रत्येक भावना तुमच्यापर्यंत पोहोचवते. ‘अस्सी’ थोडा समजायला कठी आहे, पण पूर्णपणे व्यर्थ नाही.”
तिसऱ्या एकाने लिहिले, “एक जबरदस्त आणि अस्वस्थ करणारा कोर्टरूम ड्रामा, ज्याची पकड मजबूत कथानक आणि दमदार अभिनयावर आधारित आहे. विशेषतः तापसी पन्नू आणि कानी कुस्रुति यांच्या परफॉर्मन्समुळे हा चित्रपट वेगळ्या स्तरावर जातो. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मल्टिप्लेक्स सर्किटमध्ये स्थिर कामगिरी करू शकतो. कारण सध्या त्याला टक्कर देणारा एकही सिनेमा नाही, फक्त टार्गेट ऑडियन्सने थिएटरपर्यंत पोहोचावे.”
अनुभव सिन्हा आणि तापसी पन्नू यांचा तिसरा चित्रपट
अनुभव सिन्हा आणि तापसी पन्नू यांचा हा तिसरी एकत्रित सिनेमा आहे. यापूर्वी ते ‘मुल्क’ आणि ‘थप्पड’ या चित्रपटांमध्ये ते एकत्र दिसले होते. ‘अस्सी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर समाजाला आरसा दाखवणारा, विचार करायला भाग पाडणारा आणि हादरवून टाकणारी कथा आहे.