Taapsee Pannu : मला तुम्ही कास्टच करू नका.. तापसीने सांगितलं फिल्म्स नाकारण्यामागचं कारण

तापसी पन्नू हिच्या भूमिका आणि तिच्या चित्रपटांचं बरंच कौतुक केलं जातं, तिचा परफॉर्मन्स लोकांना खूप आवडतो. पण चित्रपटाची तिची चॉईस खूप सिलेक्टिव्ह आहे. आता ती गांधारी चित्रपटात झळकणार आहे.

Taapsee Pannu : मला तुम्ही कास्टच करू नका.. तापसीने सांगितलं फिल्म्स नाकारण्यामागचं कारण
Tapsee Pannu
| Updated on: Aug 29, 2026 | 2:54 PM

बॉलिवूडमधील नावाजलेली आणि अभियनयाचं नाण खणखणीत वाजवणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू (Taapsee Pannu ).. तिचे वर्षभरात चित्रपट जरी कमी येत असले तरी ते सिलेक्टिव्ह असतात, आणि त्यांना प्रेक्षकांचा रिस्पॉन्सही चांगला मिळतो. बॉक्स ऑफीसवर तिचे काही चित्रपट चांगले चालतात, तर काही आपटतात, पण तिचा अभिनय हाँ खरा असतो, सर्वच प्रेक्षकांना, चाहत्यांना तिचं काम आवडतं. सध्या तापसी हि तिच्या गांधारी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. आत्तापर्यंतच करिअरमध्ये तापसीने फीमेल सेंट्रिक( स्त्रीप्रधान भूमिका) चित्रपट केले असून ते बऱ्याच जणांच्या पसंतीस उतरले. आता येणारा तिचा गांधारी हा चित्रपटही एक आईच्या स्ट्रगलवर आधारित आहे. याच दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तापसी तिच्या फिल्म्सच्या सिलेक्शनबद्दल मनमोकळेपणाने बोलली.

तापसीने सांगितलं इंडस्ट्रीतील ‘सेम पॅटर्न’चं सत्य

यावेळी तापसी पन्नूने अलीकडेच इंडस्ट्रीतील कलाकारांच्या कास्टिंगबाबत आपलं मत व्यक्त केलं. तिच्या मते, सध्या अनेकजण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून काम करत आहेत आणि त्याच जुन्या पद्धतींच्या भूमिका पुन्हा पुन्हा साकारल्या जात आहेत. इंटेन्स आणि ग्लॅमरस भूमिका साकारण्यासाठी इंडस्ट्रीकडे ठरावीक पाच अभिनेत्री आहेत, तर सामाजिक आणि हार्ड-हिटिंग विषयांवरील चित्रपटांसाठी आणखी काही ठरावीक अभिनेत्रींची निवड केली जाते. त्यामुळेच तिने अशा चित्रपटांना नकार देण्यास सुरुवात केली, असं तापसी म्हणाली. “मी तर निर्मात्यांना स्पष्टपणे सांगू लागले की, या चित्रपटाचा शेवट काय असेल, हे प्रेक्षक सुरुवातीपासूनच ओळखू शकतात. त्यामुळे मला अशा चित्रपटांमध्ये कास्ट करू नका. ते तुमच्या चित्रपटासाठीही चांगलं ठरणार नाही” असंही तिने नमूद केलं.

तिने पुढे सांगितलं की, हा सगळा एक प्रकारचा ‘स्नोबॉल इफेक्ट’ आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तापसीला मेनस्ट्रीम सिनेमातील पारंपरिक भूमिका फारशा मिळत नव्हत्या. त्यामुळे तिने वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका ित्रपट

कसा आहे गांधारी चित्रपट ?

गांधारी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर देवाशीष माखिजाने याचं दिग्दर्शन केलं आहे. कनिका ढिल्लोने फिल्मची निर्मिती केली आहे. यामध्ये तापसीने एक अंध आईची भूमिका निभावली आहे. 3 सप्टेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये किलीज होणार आहे.

Follow Us