‘हसीन दिलरुबा’ च्या रुपात पुन्हा चाहत्यांच्या भेटीस येणार Taapsee Pannu; पाहा अभिनेत्री खास अंदाज

'हसीन दिलरुबा' फेम तापसी पन्नू पुन्हा करणार चाहत्यांच्या मनावर राज्य; 'त्या' कारणामुळे अभिनेत्री पुन्हा चर्चेत

हसीन दिलरुबा च्या रुपात पुन्हा चाहत्यांच्या भेटीस येणार Taapsee Pannu; पाहा अभिनेत्री खास अंदाज
'हसीन दिलरुबा' च्या रुपात पुन्हा चाहत्यांच्या भेटीस येणार Taapsee Pannu; पाहा अभिनेत्री खास अंदाज
| Updated on: Jan 13, 2023 | 10:09 AM

Phir Aayi Haseen Dillruba: ‘पिंक’, ‘बदला’, ‘थप्पड’ अशा सिनेमांमध्ये भूमिका साकारत अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तापसीने फक्त मोठ्या पडद्यावरच नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि ओटीटी क्विन देखील झाली. २०२१ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘हसीन दिलरुबा’ (haseen dillruba) सिनेमातून तापसी चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली. अभिनेता विक्रांत मेसीसोबत तापसीने स्क्रिन शेअर करत चाहत्यांना थक्क केलं. आता ‘हसीन दिलरुबा’ सिनेमाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. (phir aayi haseen dillruba)

तापसी आणि विक्रांतने सिनेमाची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एवढंच नाही, तर सिनेमाची शुटिंग देखील सुरु झाली आहे. ‘हसीन दिलरुबा’ सिनेमाचा सिक्वलमध्ये विक्रांत मैसी आणि सनी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी जयप्रसादल देसाई यांच्या खांद्यावर आहे. ‘फिर आई हसीन दिलरुबा’ असं तापसीच्या नव्या सिनेमाचं नाव असणार आहे.

 

 

खुद्द तापसीने तिच्या सोशल मीडियावर सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. पोस्टरमधील तापसीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना हैराण करत आहे. अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘एका नव्या शहरात, पुन्हा एकदा… सर्वांना थक्क करण्यासाठी येणार आहे… ‘हमारी हसीन दिलरुबा” सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

फिल्ममेकर आनंद एल राय यांनी देखील एक खास ट्विट शेअर करत सिनेमाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. ‘ओ आमची ‘हसीन दिलरुबा’, ‘फिर आई हसीन दिलरुबा’ सिनेमाची शुटिंग सुरु झाली आहे. तापसीने मला सांगितलं होतं ९ वाजता पोस्टर पोस्ट करेल, पण अद्याप केलेला नाही..’ यावर अभिनेत्रीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘सर मी अद्याप तयार नाही… यावेळी माहिती नाही, कनिका ढिल्लो हे पात्र कोणत्या टप्प्यापर्यंत घेवून जाईल. माहिती नाही ही भूमिका काय खावून तयार केली आहे आणि माझ्यासोबतच नेहमी असं का होतं…’ सध्या अभिनेत्री आणि आनंद एल राय यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.