AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाद निर्मात्यांशी होता तर..; ‘तारक मेहता’च्या लेकीच्या लग्नात मालिकेतला एकही कलाकार न दिसल्याने प्रश्नांचा पाऊस

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा यांच्या मुलीचं नुकतंच धूमधडाक्यात लग्न पार पडलं. मात्र या लग्नसोहळ्याला मालिकेतील कलाकार अनुपस्थित होते. यावरून चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

वाद निर्मात्यांशी होता तर..; 'तारक मेहता'च्या लेकीच्या लग्नात मालिकेतला एकही कलाकार न दिसल्याने प्रश्नांचा पाऊस
शैलेश लोढा, दिलीप जोशी, विकी कौशलImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 09, 2026 | 9:11 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा यांच्या मुलीचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूड, राजकारण आणि इतर क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होते. अभिनेता विकी कौशलसुद्धा शैलेश यांच्या मुलीच्या लग्नाला पोहोचला होता. मात्र या सर्वांत ‘तारक मेहता..’ या मालिकेतील कलाकार कुठेच दिसले नाहीत. त्यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. इतकी वर्षे या मालिकेत काम करूनही त्यातील एकही कलाकार शैलेश लोढा यांच्या मुलीच्या लग्नाला का उपस्थित नव्हता, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

दिलीप जोशी (जेठालाल), मुनमुन दत्ता (बबिताजी), सोनालिका जोशी (माधवी), अमित भट्ट (चंपकलाल, बापूजी), मंदार चांदवडकर (भिडे) यांसह मालिकेतील इतर जुने-नवे कलाकार किंवा निर्माते असितकुमार मोदीसुद्धा या लग्नसोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, याचा संबंध शैलेश लोढा आणि निर्माते असित कुमार मोदी यांच्यात झालेल्या वादाशी आहे का? यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिलं, ‘लोकांच्या लक्षात आलंय की तारक मेहतामधील जवळपास एकही कलाकार या लग्नाला उपस्थित नव्हता. शैलेश यांच्या जवळचे मानले जाणारे दिलीप जोशीसुद्धा दिसले नाहीत. जर वाद फक्त असित मोदींसोबत होता, तर इतर कलाकार लग्नाला का आले नाहीत?’

सोशल मीडियावरील पोस्ट-

शैलेश लोढा यांची कन्या स्वरा लोढा हिचा 7 जुलै 2026 रोजी जोधपूर इथल्या प्रसिद्ध उमेद भवन पॅलेसमध्ये अत्यंत थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड, राजकारण, साहित्य, क्रीडा आणि अध्यात्म क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात विकी कौशल, कवी कुमार विश्वास, योगगुरू बाबा रामदेव, क्रिकेटपटू इरफान पठाण, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, खासदार सतीश पुनिया, सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर आणि आमदार रवींद्र सिंह भाटी यांचा समावेश होता. निर्माते असित कुमार मोदी यांच्यासोबतच्या वादानंतर शैलेश लोढाने ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडली होती.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ