फक्त 6 मिनिटांच्या डान्ससाठी तमन्ना भाटियाने घेतली तब्बल इतकी फी?

अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या आयटम साँग आणि डान्समुळे तुफान चर्चेत असते. 'आज की रात', 'नशा' यांसारखी तिची गाणी खूप गाजली. त्यामुळे चित्रपट चर्चेत आणायचा असेल तर त्यात तमन्ना भाटियासाठी एक आयटम साँग ठेवण्याचा फंडा सध्या सुरू झाला आहे.

फक्त 6 मिनिटांच्या डान्ससाठी तमन्ना भाटियाने घेतली तब्बल इतकी फी?
तमन्ना भाटिया
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 07, 2026 | 11:22 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपली विशेष छाप सोडणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या आयटम साँगमुळे सर्वाधिक चर्चेत असते. ‘जेलर’ या चित्रपटातील ‘कावाला’, ‘स्त्री 2’मधील ‘आज की रात’, ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधील ‘गाफूर’ यांसारख्या गाण्यांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. यामुळेच तिला ‘आयटम साँग क्वीन’चा टॅगही मिळाला आहे. आपले आयटम साँग तुफान गाजत असल्याचं पाहून तमन्नाने त्यासाठी तिचं मानधनसुद्धा वाढवलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फक्त सहा मिनिटांच्या डान्ससाठी तिने तगडं मानधन घेतल्याचं कळतंय.

तमन्नाने गोव्यात झालेल्या एका भव्य न्यू इअर पार्टीत डान्स केला होता. या कार्यक्रमातील तमन्नाच्या दमदार नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. जवळपास सहा मिनिटांसाठी तिने स्टेजवर परफॉर्म केलं होतं. परंतु याच सहा मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी तमन्नाने तब्बल 6 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय. 31 डिसेंबर 2025 रोजी गोव्याच्या बागा बीच इथल्या लास ओलास बीच क्लबमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तमन्नाने पंजाबी स्टार सोनम बाजवासोबत स्टेज शेअर केला होता.

तमन्नाचा डान्स-

तमन्नाने तिच्या लोकप्रिय ‘आज की रात’ या गाण्यावर दमदार डान्स सादर केला होता. तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमधील तिची ऊर्जा आणि कमालीचा स्क्रीन प्रेंझेंस यांची चाहत्यांकडून प्रशंसा होऊ लागली. तमन्नाने तिच्या एका मिनिटाच्या डान्ससाठी एक कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. कार्यक्रमात तिचा सहा मिनिटांचा परफॉर्मन्स होता. त्यासाठी तिने तब्बल सहा कोटी रुपये फी घेतली आहे. ही रक्कम सध्या चर्चेत असलेल्या साऊथ सुपरस्टार थलपती विजयच्या आगामी ‘जन नायकन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी बॉबी देओलला मिळालेल्या मानधनापेक्षाही जास्त आहे. बॉबी देओलला या चित्रपटासाठी तीन कोटी रुपये फी मिळाल्याचं म्हटलं जात आहे. तमन्नाच्या टीमकडून अद्याप तिच्या मानधनाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी या आकड्यामुळे मोठी चर्चा होत आहे. या कार्यक्रमात तमन्नासोबतच गायक मिलिंद गाबानेही परफॉर्म केलं होतं.