Tanishaa Mukerji : सरकारला कमी लेखणारे उच्चभ्रू हिंदू देश सोडून निघून जा…प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

Tanishaa Mukerji Post : अभिनेत्री तनिषा मुखर्जी सोशल मीडियावर सामाजिक तसेच राजकीय विषयांवर तिचं मत व्यक्त करते. अशातच आता अभिनेत्रीनं सरकारला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.

Tanishaa Mukerji : सरकारला कमी लेखणारे उच्चभ्रू हिंदू देश सोडून निघून जा...प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
| Updated on: Oct 11, 2026 | 8:25 PM

काजोलची बहीण आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जी सोशल मीडियावर अनेकदा उघडपणे आपली मतं मांडते. निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, तनिषानं पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीनं आरोप केला आहे की, हे लोक डोळ्यावर पट्टी बांधून आपली मतं व्यक्त करत आहेत. मात्र, तनिषानं आपल्या पोस्टमध्ये आंदोलनांचा थेट उल्लेख केला नाही.

तनिषा मुखर्जीची पोस्ट

Loading...

तनिषानं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘काही तथाकथित सुशिक्षित आणि उच्चवर्गीय हिंदूंचा अंध द्वेष पाहून मला खरोखरच धक्का बसला आहे, जे अजूनही पूर्णपणे ब्रिटिश मानसिकतेनं प्रभावित आहेत. जर तुम्हाला लंडन आणि अमेरिका इतकं आवडत असेल, तर कृपया तिथे जा! आम्हाला इथे अशा लोकांची गरज नाही जे आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. होय, देशात अनेक समस्या आहेत, पण बदलाला वेळ लागतो. गेल्या १० वर्षांत आपण कुठून आलो आहोत ते पाहा!’

‘जर आपण आपल्या सरकारला पाठिंबा दिला, तर आपल्याला अंध भक्त आणि अशिक्षित म्हटलं जातं. पण जर आपण अमेरिका आणि जर्मनीमधील अशा गटांना पाठिंबा दिला जे देशाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, तर आपल्याला कूल म्हटलं जातं! हा तुमच्या विचारांवर आणि तुमच्या विचारप्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्याचा लढा आहे. पण माध्यमांच्या प्रभावाखाली इतकं येऊ नका की, तुम्ही तुमची सारासार बुद्धी वापरणंच सोडून द्याल. केवळ कायद्याच्या राज्यानं शासित असलेला समाजच आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो.’ असं तनिषा शेवटी म्हणाली.

 

तनिषा मुखर्जी कोण आहे?

तनुजा यांची मुलगी तनिषा मुखर्जीनं २००३ मध्ये ‘श्श्श्श…’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती करण नाथ आणि डिनो मोरिया यांच्यासोबत दिसली होती, पण तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. त्यानंतर ती ‘सरकार’, ‘नील अँड निक्की’ आणि तमिळ हिट चित्रपट ‘उन्नाले उन्नाले’ मध्ये दिसली. २०१३ मध्ये ‘बिग बॉस ७’ ची पहिली उपविजेती ठरल्यानंतर तनिषाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती २०१६ मध्ये ‘खतरों के खिलाडी ७’ आणि ‘झलक दिखला जा ११’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली. तिनं ‘गँग्स ऑफ हसीपूर’ या विनोदी कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही काम केलं. तनिषा शेवटची २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटात दिसली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us