AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanushree Dutta On Nana Patekar : तनुश्री दत्ता नाना पाटेकरांबद्दल भयंकर बोलली, आतापर्यंतच सर्वात वाईट, धक्कादायक वक्तव्य, थेट त्यांच्या मृत्यूवरच..

Tanushree Dutta On Nana Patekar : मागच्या आठवड्यात नाना पाटेकर यांचं निधन झालं. नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. चित्रपट सृष्टीचं न भरुन येणार नुकसान झालं आहे. अशा स्थितीत अभिनेत्री तनुश्री दत्ता नाना पाटेकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत सुटली आहे.

Tanushree Dutta On Nana Patekar : तनुश्री दत्ता नाना पाटेकरांबद्दल भयंकर बोलली, आतापर्यंतच सर्वात वाईट, धक्कादायक वक्तव्य, थेट त्यांच्या मृत्यूवरच..
Tanushree Dutta-Nana PatekarImage Credit source: instagram/pti
| Updated on: Oct 13, 2026 | 8:40 AM
Share

दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल पुन्हा एकदा अभिनेत्री तनुश्री दत्ताने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिने नानांच्या मृत्यूच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी मृत्यूचा बनाव रचला असावा असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. इन्स्टाग्रामच्या लाइव्ह सेशनमध्ये तिने पुन्हा एकदा नानांबद्दल वाट्टेल ती वक्तव्य केली आहेत. “नाना पाटेकरांना अत्यंविधीच्यावेळी जो शासकीय सन्मान देण्यात आला, त्यावर तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. विविध देशांनी त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई करावी तसचं नानांच्या लष्करी सेवेवर, शेतकऱ्यांसाठी केलेल्या सामाजिक कार्यावर आरोप केले. नाना पाटेकरांचा मृत्यू बनावट आहे” असं धक्कादायक वक्तव्य तिने केलं. “नानांच्या मृत्यूच्यावेळच्या परिस्थितीवर तिने प्रश्नचिन्ह निर्माण केलं. नाना पाटेकरांचा मृतदेह मी पाहिला नाही. मीडियाने सुद्धा त्यांचा चेहरा दाखवला नाही” असं तनुश्रीने म्हटलय. “नानांच्या अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींना का बोलावलं नाही? त्यावरही तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या सगळ्या परिस्थितीची चौकशी करावी” अशी तिने मागणी केली.

“ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तो मृतदेह नाना पाटेकरांचा नव्हता ते सिंगापूर किंवा मलेशियामध्ये जिवंत असावेत” असं धक्कादायक वक्तव्य तनुश्री दत्ताने केलं. ‘खरा मृतदेह तिथे नव्हता. खरी बॉडी सिंगापूर, मलेशियामध्ये असावी. जिवंत आहेत ते’ असा दावा तनुश्री दत्ताने केला. “सिंगापूर, मलेशिया आणि यूएई या देशांमधल्या पोलिसांनी हस्तक्षेप करावा. या माणसाला दिसातक्षणी गोळ्या घाला अशी मी सिंगापूर, मलेशियाच्या पोलिसांना विनंती करु शकते का? तो इथे आपल्या मृत्यूचं ढोंग रचून गेलाय. मृत्यूचं बनावट प्रमाणपत्र बनवून गेलाय. याचा अर्थ तो दोषी फरार आहे” अशी धक्कादायक वक्तव्य तनुश्री दत्ताने केली आहेत.

लूकआऊट नोटीस जारी करण्याची विनंती

तनुश्रीने सिंगापूर, मलेशिया, यूएई आणि सूदानमधल्या यंत्रणांना नानांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्याची विनंती केली. “कायदेशीर प्रक्रिया टाळण्यासाठी नानांनी आपल्या मृत्यूचा बनाव रचला. डीएनए चाचणी करावी” अशा विचित्र मागण्या तनुश्री दत्ताने केल्या आहेत. नाना पाटेकर यांचं निधन झाल्यापासून तनुश्री त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत सुटली आहे. 8 ऑक्टोंबरला नाना पाटेकरांचं ह्दयविकारच्या तीव्र झटक्याने गोवा येथील राहत्या घरी निधन झालं. पुण्यात डोनजे येथे नानाची वाडी या गावात नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाना पाटेकरांच्या लष्करी सेवेबद्दल वादग्रस्त वक्तव्य

नाना पाटेकर लष्करात होते यावर तनुश्री दत्ता संशय आहे. तिने कागदोपत्री पुरावे मागितलेत. “ते जर लष्करात असतील, तर त्यांच्याकडे सॅलरी स्लीप असेल ती दाखवा” असं तनुश्रीने म्हटलंय. नाना पाटेकर यांचं अकाली निधन हे सिनेसृष्टीचं मोठं नुकसान आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान