Video: जेव्हा डॉक्टर मिलिंद गवळींना म्हणाले, “अमेरिकेत होत असेल असं, इथे नाही, चला बाहेर निघा”

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. मालिकेपासून ते आपल्या खासगी आयुष्यापर्यंत ते बऱ्याच गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त होतात. त्यांनी मुलीसाठी लिहिलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Video: जेव्हा डॉक्टर मिलिंद गवळींना म्हणाले, अमेरिकेत होत असेल असं, इथे नाही, चला बाहेर निघा
Milind Gawali
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 12:30 PM

आपल्या लेकीचा वाढदिवस हा प्रत्येक पालकासाठी खूप खास असतो. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अनिरुद्धची (Aniruddha) भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी नुकताच आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्यांनी इन्स्टाग्रामवर तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली. मुलीचा जन्म झाला, तेव्हाचा रुग्णालयातील किस्सासुद्धा त्यांनी सांगितला. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. मालिकेपासून ते आपल्या खासगी आयुष्यापर्यंत ते बऱ्याच गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त होतात. त्यांनी मुलीसाठी लिहिलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

‘आज तुझा वाढदिवस आहे, पण मला असं वाटतंय की कालच बाबुलनाथ हॉस्पिटमध्ये तुझा जन्म झाला. डॉ. एन. के शाह यांनी मला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं होतं. डिलिव्हरीच्या वेळी तुझ्या आईसोबत राहणार असल्याचा आग्रह मी त्यांना केला होता. ते म्हणाले, चला बाहेर निघा. अमेरिकेत होत असेल असं, इथे नाही. तुझा जन्म होईलपर्यंत मी चिंतेत होतो. तुझ्या जन्माच्या 25 मिनिटांनंतर, मला अजूनही तो दिवस आठवतोय, नर्स तुला माझ्याकडे घेऊन आली होती. त्यांनी मला थोडा वेळ आणखी थांबायला सांगितलं होतं, पण मी ऐकलं नाही. त्यावेळी तुला उचलून घेतल्यापासून ते आतापर्यंत मी देवाचा खूप आभारी आहे. देवाने आम्हाला छोटीशी परी भेट म्हणून दिली. मी आणि तुझी आई.. आम्ही खूप नशिबवान आहोत की तू आमची मुलगी आहेस’, अशा शब्दांत ते व्यक्त झाले. यावेळी त्यांनी मुलीच्या फोटोंचा एक कोलाज व्हिडीओसुद्धा पोस्ट केला.

पहा व्हिडीओ-

मिलिंद गवळी हे सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत जरी त्यांची भूमिका नकारात्मक असली तरी त्यांच्या अभिनयकौशल्याला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळते. शिवाय त्यांच्या सोशल मीडियावरही नेटकरी मोकळेपणे व्यक्त होत असतात.