AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay Karte: ‘त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला’; सेटवरील खास व्यक्तीसाठी मिलिंद गवळी यांची पोस्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. मग ती संजनासारखी नकारात्मक भूमिका का असेना. त्यातूनही अभिनेत्री रुपाली भोसलेनं आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला.

Aai Kuthe Kay Karte: 'त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला'; सेटवरील खास व्यक्तीसाठी मिलिंद गवळी यांची पोस्ट
Milind GawaliImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 11, 2022 | 11:14 AM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. मग ती संजनासारखी नकारात्मक भूमिका का असेना. त्यातूनही अभिनेत्री रुपाली भोसलेनं आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला. मालिकेत संजनाचा पहिल्या पती शेखरची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर खांडगे (Mayur Khandge) यांच्यासाठी मिलिंद गवळींनी (Milind Gawali) विशेष पोस्ट लिहिली आहे. मिलिंद हे मालिकेविषयी, त्यातील विविध ट्विस्टविषयी, सेटवरील वातावरणाविषयी, कलाकारांविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहित असतात. त्यांच्या या पोस्टमधून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे आणि त्यातील कलाकारांचे वेगवेगळे पैलू चाहत्यांना कळतात. मिलिंद यांनी लिहिलेल्या या पोस्टमधून ‘शेखर’ या भूमिकेत असलेल्या मयूर खांडगेंविषयी काही खास बाबी उलगडल्या आहेत. अनिरुद्ध या भूमिकेच्या लोकप्रियतेचं श्रेय यांनी मयूर यांना दिलं आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

‘मयूर खांडगे- ज्याच्या येण्याने चैतन्य येतं सेटवर, तो आला की वातावरणच बदलतं. त्याला चिडवायला, त्याला त्रास द्यायला, त्याला छळायला सगळ्यांनाच आवडतं. नेहमी हसतमुख आणि सतत काहीतरी घडत असतं तो आजूबाजूला असला की. सीनविषयी चर्चा असते, सीनमध्ये त्याला अजून काय काय करता येईल याचा सतत मनन चिंतन चालू असतं. बरं त्याचे सीन काही साधे सरळ सोपे नसतात शेखरचे. तो आला म्हणजे तो भडाभडा भडाभडा बोलणार, खूप बोलणार. बरं मुग्धा त्याची वाक्य पण अफलातून गमतीशीर मजा आणणारी लिहिते आणि तो ती वाक्य खूप छान पद्धतीने घेतो पण. त्याच्याबरोबर शूटिंग करत असताना मजाच येते. आई कुठे काय करते या सिरीयलमध्ये मयूर खांडगे हा एकमेव असा कलाकार आहे ज्यांनी मुग्धाची वाक्य अनेक वेळा बदली आहेत. बरं त्याने काही काही शब्द त्याच्या मनाची जी काय घेतलीये किंवा टाकली आहेत ते शब्द नंतर मुग्धाने वापरायला सुरुवात केली. त्यातलाच एक भन्नाट शब्द माझ्यासाठी म्हणजेच अनिरुद्धसाठी त्यांनी पहिल्याच सीनमध्ये वापरला. तो म्हणजे अन्या देशमुख. अनिरुद्धला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला,’ अशी पोस्ट मिलिंद यांनी लिहिली.

इन्स्टा पोस्ट-

रुपाली भोसलेची कमेंट-

‘मयूर खांडगे, एक भारदस्त माणूस पण त्या भारदस्त माणसात एक लहान बाळ असा आहेस तू. तू खरंच खूप प्रतिभावान अभिनेता आहेस. तुझ्यासोबत काम करताना वेगळीच मज्जा येते आणि वेगळीच ऊर्जा असते. तुझं ‘बीट्वीन द लाइन्स’ पकडणं आणि त्यावर अजून काय करता येईल याचा सतत विचार करणं हे खरंच खूप भारी आहे. त्यामुळे तुझ्यासोबतचा अभिनेता किंवा सीन अजून खुलतो. मला तुझ्यासोबतचा पहिला सीनसुद्धा ठळक आठवतो. त्यावेळी जी एनर्जी आणि जे स्पीरीट होतं ते आजही आहे. खरंच ब्लेसिंग आहे तुझ्यासोबत काम करणं. अभिनेता म्हणून तू अप्रतिम आहेसच पण माणूस म्हणूनसुद्धा तू कमाल आहेस. तू हवाहवासा वाटतोस. मिलिंद सर बरोबर बोलले की सेटवर एक वेगळी एनर्जी आणि वातावरण असतं, जेव्हा तू असतोस,’ अशा शब्दांत रुपालीने कौतुक केलं.

मिलिंद यांनी लिहिलेल्या या पोस्टचं अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनीसुद्धा कौतुक केलं आहे. ‘तू नेहमीच तुझ्या सहकलाकारांविषयी चांगलं काहीतरी लिहितोस. तुझ्याकडून ही शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि मयूर खांडगे खरंच रॉकस्टार आहे’, असं त्यांनी लिहिलं.

हेही वाचा:

रुपाली चाकणकर यांच्या मुलाचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Ranbir-Alia Wedding: लग्नाच्या चर्चांवर अखेर आलियाकडून शिक्कामोर्तब? पहा VIDEO

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.