अशोक सराफ यांना कोणती मराठी मालिका सर्वात जास्त आवडते?

Ashok Saraf Favorite Serial : मराठी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, विनोदाचे बादशाह अशोक सराफ हे सध्याच्या मालिका पाहतात का? त्यांना कोणती मालिका आवडत असावी? याचं उत्तर स्वत: अशोक सराफांनी दिलं आहे. ही मालिका अशोक सराफ रोज पाहतात. वाचा सविस्तर...

अशोक सराफ यांना कोणती मराठी मालिका सर्वात जास्त आवडते?
अशोक सराफ, अभिनेते
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 10, 2024 | 8:43 PM

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे जरी दिग्गज अभिनेते असले तरी नव्याने सिनेसृष्टीत येणाऱ्या कलाकारांचं कामही ते तितक्याच आपुलकीने आणि उत्सुकतेने पाहात असतात. ‘कलर्स मराठी’वरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही मालिका अशोक सराफ यांना फार आवडते. ही मालिका ते दररोज न चुकता पाहतात. कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणे अशोक सराफ दररोज न चुकता ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही मालिका आवडीने पाहतात. अशातच आता मालिकेतील कलाकारांनी लाडक्या अशोक मामांची भेट घेतली आहे.

अशोक सराफ यांना ‘ही’ मालिका आवडते

‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत सावीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका वाखरकरने अशोक मामांच्या भेटीचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान आम्ही अशोक मामांना भेटण्याचं ठरवलं. आमची भेट अशोक मामांसाठी सुखद धक्का होती. अशोक मामांनी भेटल्यावर लगेचच आम्हाला आपलंस केलं. मालिकेसंदर्भात ते खूप भरभरून बोलले. दररोज न चुकता ते आवडीने मालिका पाहतात. मालिका पाहताना त्यांना चित्रपट पाहिल्यासारखचं वाटतं, रसिकाने सांगितलं.

मालिकेतील कलाकार अशोक सराफांच्या भेटीला

अशोक सराफ यांना नुकतचं भेटण्याचा योग आला. आम्हाला खूप आधी आमचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर यांच्याकडून कळलं होतं की, अशोक सराफ आमची मालिका खूप आवडीने पाहतात. तसंच आम्हा सर्वांची कामं त्यांना आवडतं. अशोक मामांपर्यंत आपली मालिका पोहोचली आहे. हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यामुळे त्यांना भेटण्याची प्रतीक्षा होती. आम्ही त्यांना भेटलो. तेव्हा त्यांच्याकडून कौतुक ऐकताना मनाला फार समाधान मिळालं, असं रसिका म्हणाली.

एवढ्या मोठ्या कलाकाराकडून आपल्या अभिनयाचं कौतुक होतंय ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी शाबासकी होती. आम्ही त्यांच्यासोबत आमच्या मालिकेचा एपिसोडदेखील पाहिला. हे सर्वच आमच्यासाठी स्वप्नवत होतं. अशोक मामांनी कौतुक केल्याने आता आमची जबाबदारी वाढली आहे. पुढील वाटलालीसाठी प्रेरणा मिळाली आहे, असंही रसिका वाखरकर हिने सांगितलं.