प्रख्यात अभिनेत्री Mandira Bedi चे पती राज कौशल यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास

| Updated on: Jun 30, 2021 | 10:06 AM

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे.

प्रख्यात अभिनेत्री Mandira Bedi चे पती राज कौशल यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास
Mandira Bedi and Husband Raj Kaushal
Follow us on

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिच्या पतीचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Actress Mandira Bedi Husband Director Raj Kaushal dies of heart attack)

बॉलिवूडपटांची दिग्दर्शन-निर्मिती

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे. तर माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या सिनेमांची निर्मितीही त्यांचीच होती. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.

मंदिरा बेदीसोबत विवाह

1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशलचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं तारा बेदी कौशल असं नामकरण करण्यात आलं होतं.

रविवारचा दिवस आनंदात

राज कौशल यांच्या मुलांनी गेल्या रविवारीच फादर्स डे निमित्त वडिलांसोबत सेल्फी शेअर केले होते. तर, राज कौशल यांनी रविवारी मित्रांसोबत पार्टीही केली होती. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपला वीकेंड अत्यंत शानदार गेल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

मंदिरा बेदी यांच्या कुटुंबाचा फोटो

मंदिरा बेदीची कारकीर्द

49 वर्षीय मंदिरा बेदीने 1994 मध्ये शांती मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. त्यानंतर क्योंकि सास भी कभी बहू थी, जस्सी जैसी कोई नहीं यासारख्या मालिकांतही ती झळकली. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटातून 1995 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर बादल, शादी का लड्डू, मीराबाई नॉट आऊट यासारख्या सिनेमांमध्ये ती झळकली.

संबंधित बातम्या :

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील खाशाबा हरपला, 29 व्या वर्षी अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

(Actress Mandira Bedi Husband Director Raj Kaushal dies of heart attack)