Mandira Bedi | पतीच्या निधनामुळे कोसळला दुःखाचा डोंगर, मैत्रीण मौनी रॉयने घेतली मंदिराची भेट!

प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने मंदिरा बेदीला खूप धक्का बसला आहे,

Mandira Bedi | पतीच्या निधनामुळे कोसळला दुःखाचा डोंगर, मैत्रीण मौनी रॉयने घेतली मंदिराची भेट!
मौनी रॉय
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 10:53 AM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने मंदिरा बेदीला खूप धक्का बसला आहे आणि या कठीण काळात तिची मैत्रीण अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आपल्या मैत्रीणला आधार देण्यासाठी तिच्या घरी पोहोचली आहे. बुधवारी संध्याकाळी मौनी मंदिराच्या घरी पोहोचली होती. यादरम्यान मौनीच्या चेहऱ्यावरही दुःख स्पष्ट दिसत होते (Actress Mouni Roy reached at Mandira Bedi House).

मौनी रॉय आणि मंदिरा बेदी एकमेकींच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघेही खूप वेळ एकत्र एकमेकांच्या कुटुंबासोबत घालवतात. एवढेच नाही, तर मौनी आणि मंदिराची मंगळवारी भेट देखील झाली होती आणि दोघांनीही बरीच धमाल केली होती. पण, कोणाला माहित होते की, त्याच्या एक दिवसनंतर मंदिराच्या जीवनात दु:खाचे वादळ येईल.

मौनीशिवाय अभिनेत्री रवीना टंडनही मंदिराला भेटायला तिच्या घरी पोहोचली होती. राज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रोनित रॉय, आशिष चौधरी यांच्यासह टीव्ही आणि बॉलिवूडमधील अधिक सेलेब्स आले होते.

पाहा फोटो :

मंदिराने दिली शेवटपर्यंत साथ

राजचा मृतदेह स्मशानभूमीत नेत असताना मंदिरासुद्धा त्याच रुग्णवाहिकेत होती. इतकेच नाही तर स्वत: मंदिरानेही राज यांचा मृतदेह उचलला होता. साधारणपणे हे सर्व कार्य पुरुष करतात, परंतु मंदिराने ही प्रथा मोडली.

राज गेल्यानंतर आता मंदिराला दोन्ही मुलांचा सांभाळ एकट्याने करावा लागणार आहे. राज आणि मंदिराचे 1999 साली लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांनी एका मुलीला गेल्या वर्षीच दत्तक घेतले होते. घरी मुलगी आल्यामुळे राज खूप खुश झाला होता. इतकेच नाही तर, ते सोशल मीडियावर मुलांबरोबर फोटोही शेअर करत असत.

नुकताच राज यांनी मुलांसमवेत फादर्स डे साजरा केला होता. मंदिरा बेदीचे पती राज कौशल एक भारतीय दिग्दर्शक, निर्माता होते. ‘प्यार मे कभी कभी’, ‘शादी का लड्डू’, ‘अँथनी कौन है’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.

मंदिरा बेदीची कारकीर्द

49 वर्षीय मंदिरा बेदीने 1994 मध्ये शांती मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. त्यानंतर क्योंकि सास भी कभी बहू थी, जस्सी जैसी कोई नहीं यासारख्या मालिकांतही ती झळकली. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटातून 1995 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर बादल, शादी का लड्डू, मीराबाई नॉट आऊट यासारख्या सिनेमांमध्ये ती झळकली.

(Actress Mouni Roy reached at Mandira Bedi House)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.