Munmun Dutta: ‘तारक मेहता..’च्या चाहत्यांना झटका! शैलेष लोढानंतर आता ‘बबिता’ही मालिका सोडणार?

प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील एक लोकप्रिय व्यक्तीरेखा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय. ही व्यक्तीरेखा आहे बबिताची. अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) मालिकेत बबिताची (Babita) भूमिका साकारतेय.

Munmun Dutta: तारक मेहता..च्या चाहत्यांना झटका! शैलेष लोढानंतर आता बबिताही मालिका सोडणार?
Munmun Datta
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 10:54 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेने गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजही असे असंख्य प्रेक्षक आहेत, जे या मालिकेचे जुने एपिसोड्ससुद्धा पुन्हा बघतात. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील एक लोकप्रिय व्यक्तीरेखा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय. ही व्यक्तीरेखा आहे बबिताची. अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) मालिकेत बबिताची (Babita) भूमिका साकारतेय. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका सुरू आहे आणि आतापर्यंत मुनमुन यांची जागा मालिकेत कोणी घेतली नाही. मालिकेतील इतर काही कलाकार बदलले, मात्र बबिताची भूमिका अजूनही तशीच आहे. जेठालाल आणि बबिता यांच्यातील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र आता काही कारणास्तव मुनमुन ही मालिका सोडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

मुनमुनला ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सिझनची ऑफर आल्याचं कळतंय. त्यामुळे जर मुनमुनने ती ऑफर स्वीकारली तर काही काळासाठी तिला मालिकेतून बाहेर पडावं लागेल. मुनमुनने अद्याप बिग बॉसच्या ऑफरबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही. ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सिझन गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेत्री दिव्या अग्रवालने या सिझनच्या विजेतेपदाचा किताब जिंकला होता.

पहा फोटो-

जर तुम्ही बिग बॉस या शोचे चाहते असाल तर बिग बॉस हिंदीच्या पंधराव्या सिझनमध्ये तुम्ही मुनमुनली नक्की पाहिलं असाल. चॅलेंजर म्हणून मुनमुन या सिझनमध्ये सहभागी झाली होती. तिच्यासोबत टीव्ही कलाकार सुरभी चंद्रा, आकांक्षा पुरी आणि विशाल पुरी यांनीसुद्धा एण्ट्री केली होती.