TMKOC | ‘बबिता जी’ फेम मुनमुन दत्तासोबत रिलेशनशिपची चर्चा, पाहा काय म्हणाला ‘टप्पू’?

टीव्हीच्या लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘टप्पू’ आणि ‘बबिता जीं’ची भूमिका साकारणारे राज अनादकत (Raj Anadkat) आणि मुनमुन दत्ता (Munmun Dutta) काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, दोघेही सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत.

TMKOC | ‘बबिता जी’ फेम मुनमुन दत्तासोबत रिलेशनशिपची चर्चा, पाहा काय म्हणाला ‘टप्पू’?
Raj Anadkat

मुंबई : टीव्हीच्या लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘टप्पू’ आणि ‘बबिता जीं’ची भूमिका साकारणारे राज अनादकत (Raj Anadkat) आणि मुनमुन दत्ता (Munmun Dutta) काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, दोघेही सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. ही बातमी जाणून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. आधी दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण आता मुनमुन आणि राज यांनी सोशल मीडियाद्वारे आपला संदेश दिला आहे.

मुनमुन पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाली की, तिला भारताची मुलगी असल्याची लाज वाटते. तर, मुनमुन नंतर आता राजने देखील या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी त्यांच्याविरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना संदेश दिला आहे की, अशा बातम्यांमुळे त्याच्या जीवनावरही मोठा परिणाम झाला आहे.

काय लिहिले राजने? जाणून घ्या…

राज अनादकत याने लिहिले की, ‘जो कोणी माझ्याबद्दल काहीही लिहित आहे, फक्त या तुमच्या बनावट कथांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचार करा. माझे मत जाणून न घेता माझ्याबद्दल काहीही लिहित आहात. जे काही सर्जनशील लोक माझ्याबद्दल लिहित आहेत, त्यांनी त्यांची सर्जनशीलता इतरत्र दाखवावी. देव त्या लोकांना थोडीतरी समज दे.’

पाहा राजची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

काय म्हणाली मुनमुन दत्ता?

मालिकेत ‘बबिता जीं’चे पात्र साकारणाऱ्या मुनमुनने रविवारी 2 पोस्ट टाकल्या आणि यावेळी तिने आपल्याबद्दल चुकीच्या बातम्या लिहिणाऱ्या लोकांचा चांगलाच क्लास घेतला आहे. मुनमुनने असेही म्हटले की, तिला स्वतःला भारताची मुलगी म्हणण्यास देखील लाज वाटते.

पहिल्या पोस्टमध्ये मुनमुनने लिहिले, ‘तुम्ही कोणाबद्दल काहीही कसे लिहू शकता. आपल्या लेखांमधून कोणाच्या आयुष्यात काय घडेल याची जबाबदारी तुम्ही घेता का? ज्या आईचा मुलगा तिला इतक्या लहान वयात सोडून गेला आहे, तिच्या चेहऱ्यावर कॅमेरा घेताना तुम्हाला लाज वाटत नाही का? जिने आपले प्रेम गमावले आहे तिला देखील तुम्ही कॅमेराने घेरले. तुम्हाला लाज वाटत नाही का?

दुसऱ्या पोस्टमध्ये मुनमुनने लिहिले की, ‘जे कमेंट विभागात उलट सुलट लिहित आहेत, त्यांनीही विचार करावा. 13 वर्षांपासून मी लोकांचे मनोरंजन करत आहे आणि 13 मिनिटांत तुम्ही माझी प्रतिमा पूर्णपणे खराब केली आहे. जर, पुढच्या वेळी जेव्हा कोणी वैद्यकीयदृष्ट्या उदासीन असेल, नैराश्यात असेल किंवा कोणीतरी आपले जीवन संपवेल, तेव्हा निश्चितपणे विचार करा की, हे तुमच्या शब्दांमुळे घडले आहे की नाही… आज भारताची लेक म्हणवून घ्यायला मला स्वतःची लाज वाटते आहे.’

हेही वाचा :

Happy Birthday Usha Nadkarni | 75 वर्षांचा सळसळता उत्साह! मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातही उषा नाडकर्णींचा दमदार अभिनय!

Little Kiara : ‘ही’ लहान मुलगी अभिनयात कियारा आडवाणी पेक्षाही वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI