
Bigg Boss 19 Eviction : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित रिॲलिटी शो असलेला ‘बिग बॉस 19’ सीझन सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. एवढ्या काळातच या शोमध्ये बरंच काही घडलं असून रोज नवनवे ड्रामे सुरू असतातच. गेल्या चार आठवड्यांपासून अनेक स्पर्धक गाजत आहेत, तर इतके दिवस जे शांत होतं, तेही आता चांगलेच ॲक्टिव्ह झालेले दिसत आहे, त्यांचा गेम दिसायला लागला आहे. दबंग स्टार सलमान खान हा शो होस्ट करत असून आत्तापर्यंत या शोमधून दोन स्पर्धक घराबाहेर पडले आहे, त्यामध्ये नतालिया आणि नगमाच्या नावाचा समावेश आहे. तर गेल्या आठवड्यात नेहल ही देखील शो मधून बाहेर गेली होती, पण ‘बिग बॉस’ने नेहमीप्रमाणेच गेम खेळत तिला सीक्रेट रूममध्ये पाठवलं आहे.
वीकेंड येताच बिग बॉसमध्ये एव्हिक्शनचे वारे वाहू लागतात, आता यावेळेस या शोमधून जो स्पर्धक बाहेर जाणार आहे, त्याचं नाव समोर आलं आहे.
हे स्पर्धक झाले होते नॉमिनेट
काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 19’ मध्ये एक नॉमिनेशन टास्क होता, ज्यामध्ये प्रणित मोरेची टीम हरली. त्यानंतर, त्याची संपूर्ण टीम नॉमिनेट झाली. ज्यात प्रणित मोरे, मृदुल तिवारी, गौरव खन्ना, अवेज दरबार, अशनूर कौर आणि नीलम गिरी यांचा समावेश होता. आता, या स्पर्धकांपैकी एक हा, येत्या या वीकेंड का वारमधून घराबाहेर जाणार आहे.
कोणता स्पर्धक झाला आऊट ?
यापूर्वी अशी बातमी समोर आली होती की फरहाना भट्ट ‘बिग बॉस 19’ मधून बाहेर पडली आहे. मात्र, “बिग बॉस” बद्दल , सर्व छोट्या मोठ्या बातम्या देणाऱ्या एका पेजनुसार, अवेज दरबार या आठवड्यात शोमधून बाहेर पडेल. पब्लिक व्होटिंगच्या आधारे बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वीकेंड का वार मध्ये येणार गौहर खान
या वीकेंड का वार एपिसोडमध्ये गौहर खान सलमान खानसोबत सेटवर दिसणार आहे. खरं तर, गौहर अवेजला पाठिंबा देण्यासाठी शोमध्ये येणार आहे. तसेच ती अनेक स्पर्धकांची प्रशंसा करेल आणि काहींना फटकारेल सुद्धा. मात्र. या आठवड्यात अवेजच्या खेळात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. आता तो खरोखरच बाहेर पडेल की बिग बॉस त्याला नेहलप्रमाणे सीक्रेट रूममध्ये पाठवेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.