Bigg Boss 16 | एका टास्कमुळे शालिन भनोट, सुंबुल ताैकीर यांच्या मैत्रीत मोठी दरार

शालिन तुझी पाठीमागे बदनामी करत असल्याचे वेळोवेळी सर्वजण सुंबुलला सांगत होते.

Bigg Boss 16 | एका टास्कमुळे शालिन भनोट, सुंबुल ताैकीर यांच्या मैत्रीत मोठी दरार
| Updated on: Nov 08, 2022 | 2:00 PM

मुंबई : बिग बॉसमध्ये कधी कोणते नाते कधी बदलेन याचा अजिबातच नेम नाही. बिग बाॅसच्या मंचावर येत सुंबुल ताैकीरच्या वडिलांनी शालिन आणि टीनापासून लांब राहण्याचा सल्ला मुलीला दिला होता. शालिन तुझी पाठीमागे बदनामी करत असल्याचे वेळोवेळी सर्वजण सुंबुलला सांगत होते. मात्र, असे असूनही सुंबुलने शालिनची साथ सोडली नव्हती. याचविषयावर सलमान खानने सुंबुलचा क्लास देखील घेतला होता. शेवटी आता शालिन आणि सुंबुलच्या नात्यामध्ये दरार निर्माण झालीये.

सुंबुल तौकीर आणि शालीन भनोटमध्ये जोरदार वाद झालेले बघायला मिळणार आहेत. यांच्या नात्यामध्ये मोठी दरार निर्माण होणार आहे. शोच्या आगामी एपिसोडमध्ये सुंबुल शालिनसोबत जोरदार भांडताना दिसणार आहे. शोच्या आगामी भागात शालिनला टीना आणि सुंबुलपैकी एकाला नॉमिनेट करायचे आहे आणि एकाला वाचवायचे आहे.

शालिन सुंबुलला नॉमिनेट करतो आणि टीनाला वाचवतो. जे सुंबुलला अजिबातच आवडत नाही. सुंबुल शालिनला म्हणते की तुझ्यासाठी माझ्या अगोदर कायमच टीना असते. पण टीनाच्या अगोदर आपली मैत्री झालेली आहे. शालिन स्वतःचा बचाव करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण सुंबुलने काही न ऐकता आपली मैत्री संपल्याचे सरळ शालिनला सांगते आणि म्हणते की, बिग बाॅसच्या घरात तुम्ही फक्त एकच मैत्रीण आहे, ती म्हणजे टीना