Bigg Boss 16 | अर्चना गाैतम हिने घेतला थेट एमसी स्टॅनसोबत पंगा, घरामध्ये मोठा हंगामा

आता परत एकदा कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी अर्चना गाैतम भांडणे करताना दिसत आहे.

Bigg Boss 16 | अर्चना गाैतम हिने घेतला थेट एमसी स्टॅनसोबत पंगा, घरामध्ये मोठा हंगामा
| Updated on: Jan 04, 2023 | 6:07 PM

मुंबई : बिग बाॅस सीजन 16 मधील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून अर्चना गाैतम हिचे नाव पुढे येतंय. अर्चना गाैतम काहीही कारण नसताना घरातील स्पर्धेकांसोबत भांडणे करताना दिसते. इतकेच नाहीतर भांडणामध्ये ती दुसऱ्यांच्या आई वडिलांवर देखील जाते. गेल्या आठवड्याच्या विकेंडच्या वारमध्ये सलमान खान याने यावरून अर्चना गाैतम हिचा जोरदार क्लास लावला होता. त्यानंतर फक्त दोन दिवस अर्चना घरामध्ये शांत राहिली. आता परत एकदा कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी अर्चना गाैतम भांडणे करताना दिसत आहे.

यावेळेस अर्चनाला भांडणे करण्यासाठी दुसरे कोणी भेटले नसल्यामुळे बाथरूम स्वच्छ करण्यावरून तिने एमसी स्टॅनसोबत भांडणे करण्यास सुरूवात केलीये. बिग बाॅसच्या घराचा नवा कॅप्टन आता अब्दु झाला आहे.

कॅप्टन अब्दु रोजिक असताना अर्चना एमसीने बाथरूम स्वच्छ केले नसल्याचे म्हणत गोंधळ घालते. मुळात घराचा कॅप्टन हा अब्दु असल्यामुळे कोण काम करत नाही, याची जबाबदारी अब्दुची असताना अर्चना विनाकारण भांडणास सुरूवात करते.

एमसी स्टॅन याच्यासोबत अर्चना पंगा घेते. यावेळी एमसी आणि अर्चना दोघेही एकमेकांना अनेक गोष्टी सुनावतात. मात्र, भांडणे झाल्यानंतर अर्चना नेहमीप्रमाणे लोकांची सहानुभूती घेण्यासाठी रडताना दिसली.

अर्चनासोबत भांडणे झाल्यानंतर एमसी म्हणतो की, मला आता या शोमध्ये राहिचे नाहीये. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, एमसी बिग बाॅसच्या घरातील साहित्याची मोडतोड करतोय.

साजिद खान म्हणतो, तुला बिग बाॅसच्या घराबाहेर पडायचे आहे. तर मग ज्या व्यक्तीने तुला त्रास दिला आहे. तिच्या कानाखाली जाऊन मार…विशेष म्हणजे एमसी जाण्याचाही प्रयत्न करतो, परंतू शिव ठाकरे त्याला पकडून ठेवतो.

साजिद खान हा एमसीला अर्चनाच्या कानाखाली जाऊन मारण्याचा सल्ला देतो. यामुळे एमसीचे फॅन हे आता साजिद खान याला टार्गेट करताना दिसत आहेत.