Bigg Boss 16 | निमृत कौर अहलुवालिया हिच्या चाहत्यांना मोठा धक्का, अभिनेत्री बेघर?

बिग बाॅसच्या निर्मात्यांनी हे सीजन हीट करण्यासाठी सुरूवातीपासूनच कंबर कसली होती. आता बिग बाॅसच्या घरात अब्दु रोजिक याचा मित्र आणि सुंबुल ताैकिर हिची काका येणार आहेत.

Bigg Boss 16 | निमृत कौर अहलुवालिया हिच्या चाहत्यांना मोठा धक्का, अभिनेत्री बेघर?
| Updated on: Jan 12, 2023 | 8:16 PM

मुंबई : बिग बाॅसच्या घरात सध्या मोठा हंगामा होताना दिसत आहे. बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) मध्ये सध्या फॅमिली वीक सुरू असून स्पर्धेकांचे फॅमिली मेंबर घरामध्ये येऊन धमाका करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅस १६ चा टीआरपी (TRP) जबरदस्त वाढला आहे. हे सीजन हीट होत आहे. बिग बाॅसच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत बिग बाॅस १६ एक महिन्यासाठी वाढवले आहे. बिग बाॅसच्या निर्मात्यांनी हे सीजन हीट करण्यासाठी सुरूवातीपासूनच कंबर कसली होती. आता बिग बाॅसच्या घरात अब्दु रोजिक याचा मित्र आणि सुंबुल ताैकिर हिची काका येणार आहेत.

निम्रत काैर अहलुवालियाचे वडिल हे बिग बाॅसच्या घरात आले होते. यावेळी त्यांनी मंडळीपासून दूर राहण्याचा सल्ला आपल्या मुलीला दिला. निम्रतचे वडील म्हणाले, तू मंडळीमध्ये राहून गेम खेळत असल्यामुळे तुझा गेम दिसत नाहीये.

वडिलांचे बोलणे निम्रतला आवडले नसून पप्पा तुम्ही असे बोलू नका असे निम्रत म्हणते. निम्रत आणि तिच्या वडिलांमधील वाद इतका जास्त वाढतो की, निम्रत थेट रडायलाच लागते.

बिग बाॅसच्या घरात राहायचे असेल तर तुम्हाला एका फॅमिलीची गरज असल्याचे निम्रत म्हणते. निम्रतचे वडील अर्चनाला देखील हे सर्व बोलतात. साैंदर्या आणि तुझ्यासोबत जर निम्रत राहिली तर तिचा गेम छान होईल असेही म्हणतात.

वडिलांनी जे काही सांगितले ते सर्व आता निम्रत साजिद खान याला सांगताना दिसत आहे. मात्र, नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार या आठवड्यामध्ये निम्रतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.

कारण रिपोर्टनुसार निम्रत काैर ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडणार आहे. या आठवड्यामध्ये निम्रत ही नाॅमिनेशनमध्ये असून कमी मत मिळाल्यामुळे ती बेघर होणार आहे, असे सांगितले जात आहे.